NEET च्या गुण आकारणीबाबत फेरविचारासाठी नवी समिती

 NEET च्या गुण आकारणीबाबत फेरविचारासाठी नवी समिती

नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : NEET(UG) 2024 परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे 5 मे 2024 रोजी 571 शहरांमधील 4750 केंद्रांवर (परदेशातील 14 शहरांसह) घेण्यात आली. याचा निकाल ४ जून ला जाहीर करण्यात आला या परीक्षेदरम्यान काही केंद्रांवरील विद्यार्थ्यांना नियोजित असलेला पूर्ण ३ तास २० मि.चा वेळ देण्यात आला नाही अशा तक्रार प्राप्त झाल्याने या विद्यार्थांना compensatory Marks देण्यात आले होते. NTA या निर्णयामुळे अन्य विद्यार्थ्यांना समस्या निर्माण होऊ शकतात अशा तक्रारी येऊ लागल्याने आता या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी NTA ने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

NEET रिझल्ट ४ जून ला जाहीर करण्यात आला. आधी तो १४ जूनला लागणार असे घोषित करण्यात आले होते. ही तारीख बदलल्यामुळे NTA च्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याला उत्तर देताना एका निवेदनाद्वारे NTA ने म्हटले आहे की, NTA ने अशी भूमिका घेतली आहे की ४ जून २०२४ पर्यंत निकाल तयार झाले असल्याने, घोषणा आणखी दहा दिवस उशीर करण्याचे काही कारण नव्हते. शिवाय, एनटीए वर्षानुवर्षे निकाल जाहीर करण्याच्या वेळेत सुधारणा करण्याच्या दिशेने काम करत आहे.

यावर्षी NEET चा कट ऑफ खूपच जास्त लागला आहे, बऱ्याच परीक्षार्थींना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. सर्वांधिक गुण मिळवलेल्या ८ परीक्षार्थीं पैकी ६ परिक्षार्थी एकाच केंद्रावर होते. याबाबतही प्रश्न उपस्थिक करण्यात आले होते. यावर NTA ने कट ऑफ हे उमेदवारांच्या सापेक्ष कामगिरीवर अवलंबून बदलतात, असे स्पष्टीकरण दिले आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मे 2019 पासून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (MoHFW) वतीने NEET (UG) परीक्षा आयोजित करत आहे, अंडरग्रेजुएट वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकसमान प्रवेश-सह-पात्रता परीक्षा म्हणून (MBBS, BDS, इ.) देशभरातील सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये याद्वारे प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते.

SL/ML/SL

8 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *