नक्षलभागात मतदान साहित्य पोहोचायला सुरूवात

 नक्षलभागात मतदान साहित्य पोहोचायला सुरूवात

गडचिरोली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्हात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पेट्या हलविण्याचे काम सुरू झाले असून 19 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी आज सकाळपासून गडचिरोलीत ईव्हीएम आणि इतर युनिटसह पोलिंग पार्टीना नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भागात भारतीय लष्कर, वायुसेनेच्या हेलिकॉप्टर द्वारे घेऊन जाण्यास सुरुवात करण्यात आले आहेत. यात भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या 3 MI 17 आणि 4 ALH हेलिकॉप्टरच्या साहाय्याने विविध संवेदनशील आणि अतिसंवेदनशील, नक्षग्रस्त भाग आहे यामध्ये 68 ठिकाणी बूथवरील 295 मतदान कर्मचाऱ्यांना चॉपर च्या सहाय्याने सुखरूप सोडले जात आहे.

ML/ML/PGB 16 APR 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *