मुंबईत २०० कोटींचे ड्रग जप्त, एनसीबीने केली चौघांना अटक

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एनसीबीने नवी मुंबईत गुरूवारी मोठी कारवाई केली असून चार आरोपींना अटक केली. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल आता ॲक्शनमोडवर आले आहे. कडक कारवाई करत मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चार जणांना अटक केली. शिवाय त्यांच्याकडून विविध प्रकारचे ड्रग्ज जप्त केले आहेत. या ड्रग्जची एकूण किंमत सुमारे २०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
ML/ML/PGB 7 Feb 2025