राजकोट येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मोदींच्या हस्ते अनावरण

 राजकोट येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मोदींच्या हस्ते अनावरण

सिंधुदुर्ग, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय नौसेनेच्या 52 व्या नौसेना दिनाचे औचित्य साधून आज मालवण, राजकोट इथं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. महाराष्ट्र शासनाने किल्ले सिंधुदुर्गच्यासमोर राजकोट किल्ला येथे हा भव्य ब्रॉंझचा पुतळा उभारला आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत आदी उपस्थित होते. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आठवण करून देणाऱ्या चित्र प्रदर्शनाची पाहणी केली.

SL/KA/SL

4 Dec. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *