फिरता मोफत दवाखाना
कोल्हापूर, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या फिरत्या मोफत दवाखान्याचा लोकार्पण सोहळा आज झाला.Mobile free clinic
भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आयोजित
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या फिरत्या मोफत दवाखान्याचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात संपन्न झाला. खासदार धनंजय महाडिक अध्यक्षस्थानी होते.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मी कोठून पैसे आणतो, याचा शोध घेण्यापेक्षा लोकांची कामं करा. माझ्याकडून काही शिकायचं असल्यास लोकांच्या मदतीला धावून जा. त्यातून मतं मिळतील की नाही हे मलाही माहित नाही. पुण्य मात्र नक्की मिळेल. विरोधकांना माझ्यावर टीका करून प्रसिद्धी मिळणार असेल, तर त्यांनीही ती करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
मोफत फिरता दवाखाना
रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
कोल्हापुरातील दौलतनगरातील तीन बत्ती चौकात हा कार्यक्रम पार पडला. मंत्री पाटील पुढे म्हणाले, लोकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्याचं काम सुरू आहे. आरोग्य विषयक सेवा लोकांना उपलब्ध करणं आवश्यक आहे. राजकारण बाजूला ठेवून हातात हात घालून करण्याचं हे सेवा भावी काम आहे.
पुण्यातही हा उपक्रम सुरु केला आहे. दिवसभरात 171 जणांनी उपचार करून घेतले. फिरता दवाखान्यात केसपेपर केला जात नाही की औषधाचे पैसे घेतले जात नाहीत.
ML/KA/PGB
6 Mar. 2023