बँक विलीनीकरणासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँक करणार सर्वेक्षण

 बँक विलीनीकरणासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँक करणार सर्वेक्षण

मुंबई, दि.27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) अलिकडेच करण्यात आलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरणाच्या (Merger of Banks) संदर्भात ग्राहकांच्या समाधानाविषयी माहिती मिळवण्यासाठी सर्वेक्षण (Survey) करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत इतर प्रश्नांव्यतिरिक्त ग्राहक सेवांच्या बाबतीत हे विलीनीकरण सकारात्मक होते की नाही, असेही विचारले जाईल. या प्रश्नाच्या उत्तरात, ग्राहकांकडे – अत्याधिक सहमत, सहमत, ठीक, असहमत, अत्याधिक असहमत असे पर्याय असतील.
 

लोकांना 22 प्रश्न विचारले जातील
People will be asked 22 questions

हे सर्वेक्षण उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरात सहित 21 राज्यांमधून एकूण 20,000 ग्राहकांवर करण्यात येईल, ज्यात 22 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. या 22 प्रश्नांमधील चार प्रश्न विशेष करुन त्या बँकांच्या ग्राहकांसाठी आहेत ज्यांच्या शाखा इतर बँकांच्या शाखांमध्ये विलीन (Merger of Banks) झाल्या आहेत. या ग्राहकांना ग्राहक सेवा आणि तक्रारींचे निवारण यासंदर्भातील यांच्या अनुभवांबद्दल विचारले जाईल.
 

या बँकांचे अलीकडेच झाले विलिनीकरण
These banks were recently merged

वास्तविक, पीएसबी बँकांच्या विलिनीकरण (Merger of Banks) अंतर्गत देना बँक आणि विजया बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण करण्यात आले होते. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आले. कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक यांचे विलिनीकरण झाले. या व्यतिरिक्त, इंडियन बँकेसोबत अलाहबाद बँक आणि युनीयन बँक ऑफ इंडीयासह आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकरण झाले. या व्यतिरिक्त लक्ष्मीविलास बँकेचे डीबीएस बँकेत विलिनीकरण करण्यात आले.
 
The Reserve Bank of India has decided to conduct a survey to get information on customer satisfaction in the context of the recent merger of public sector banks. Among other questions, it will be asked whether the merger was positive in terms of customer service. In answer to this question, customers will have the options – highly agree, agree, ok, disagree, highly disagree.
PL/KA/PL/27 APR 2021

mmc

Related post