भारतीय पोस्ट खात्यात ९८ हजार पदांची मेगा भरती
मुंबई,दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील प्रत्येक गावात पोहोचलेला भारत सरकारचा उपक्रम म्हणजे पोस्ट खाते. कुरिअरच्या जमान्यातही अद्ययावत राहत पोस्टाने आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. वर्षानुवर्षे भारतीय समाजमानामध्ये स्थान कमावलेल्या पोस्ट खात्यामध्ये यावर्षी आजवरची सर्वांत मोठी मेगा भरती होणार आहे. १० वी, १२ वी पास विद्यार्थी या जागासाठी अर्ज करू शकतात.
तब्बल ९८, ०८३ जागांसाठी ही भरती होणार आहे. ज्यात पोस्टमॅन पदासाठी ५९,०९९, मेल गार्डसाठी १४४५, मल्टीटीस्कींग स्टाफ म्हणून ३७, ५३९ जागा आहेत. या जागा देशभरात २३ ठिकाणी भरल्या जाणार आहेत. India Post Office Recruitment 2022
पदनिहाय पात्रता
- पोस्टमॅन पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे.
- मेलगार्ड पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.
- एमटीएस पादासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. संगणकाच बेसिक ज्ञान असावं.
- या पदांसाठी खुल्या प्रवर्गातील अर्जदाराची वयोमर्यादा १८ ते ३२ वर्ष एवढी आहे.वयोमर्यादा
- एसटी/एससी – ५ वर्ष अधिक म्हणजे ३८ वर्षापर्यंत
- ओबीसी – ३५ वर्षापर्यंत
- इडब्ल्युसी – एनए, पीडब्ल्यु साठी १० वर्ष अधिक, ओबीसी १३ वर्ष अधिक
- पीडब्ल्यूडी एससी/एसटी १५ वर्ष अधिक
या भरती प्रक्रीयेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx (Post Office Vacancy 2022) या संकेतस्थळावर भेट द्या.