ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दिसली मायाची ‘माया’

 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात दिसली मायाची ‘माया’

चंद्रपूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात माया वाघिणीच्या मायेचा आणखीन एक क्षण पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालाय. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून माया वाघीण आपल्या बछड्याला तोंडात धरून भ्रमण करताना दिसत आहे. हा छोटा तीन महिन्याचा बछडा पाण्यात पडून ओला झाला होता. माया वाघिणींने त्याला अलगद धरून सुरक्षित ठिकाणी नेले.Maya’s ‘Maya’ seen in Tadoba-Andhari tiger project

हा क्षण एका पर्यटकाने कॅमेऱ्यात टिपला असून सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमात चांगलाच चर्चेत आहे. या आधीही माया वाघिणीने आपल्या बछड्यांसोबतच्या दंगामस्तीने व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्रदर्शनाला वेगळा आयाम दिला आहे. मायाच्या कीर्तीमुळेच ताडोबातील व्याघ्रपर्यटन अधिक रंजक व लक्षवेधी होत आहे.

ML/KA/PGB
3 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *