अपहरण झालेल्या एका वर्षाच्या मुलीची सुखरूप सुटका

 अपहरण झालेल्या एका वर्षाच्या मुलीची सुखरूप सुटका

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सांताकुझ येथून अपहरण झालेल्या एका वर्षाच्या मुलीची सुखरूप सुटका करण्यात मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे.Kidnapped one-year-old girl rescued safely सांताक्रूझ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एसएनडीटी कॉलेज समोरील बस स्टॉप जुहु तारा रोड येथील फुटपाथपावर मुस्कान अदनान शेख ही महिला आपल्या 1 वर्षाच्या मुलीसह झोपलेली होती.यावेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी त्यांचे मुलीस पळवून नेले होते .या घटनेची माहिती त्यांनी स्वतः सांताक्रूझ पोलिसांना दिली .

मुस्कान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून, गुन्हयाचा समांतर तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या .वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे अन्वेषण विभाग कक्ष 9 च्या पथकाने घटनास्थळी भेट देवून तेथील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली. तसेच यापूर्वी घडलेल्या घटना व गोपनीय माहितीच्या तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे, गुन्हयातील आरोपी हे बळीत मुलीसह मुंबई येथुन हैद्राबाद, हैद्राबाद येथून सोलापूर येथे रेल्वेने येणार असल्याची माहिती मिळाली. ही माहिती तात्काळ सोलापूर आरपीएफ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली .

या गुन्हयातील आरोपीताचा शोध घेवून बळीत मुलगी व आरोपीस ताब्यात घेण्याबाबत कळविले. त्यानुसार या कक्षातील पोलीस पथकाने योग्य ती खातरजमा करून, गुन्हयातील दोन महिलांना ताब्यात घेवुन अपहरण झालेल्या मुलीची त्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली.

SW/KA/PGB
3 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *