अपेक्षेपेक्षा चांगल्या GDP डेटाच्या पार्श्वभूमीवर विशेष सत्र असलेल्या आठवड्यात बाजाराचा विक्रमी उच्चांक

 अपेक्षेपेक्षा चांगल्या GDP डेटाच्या पार्श्वभूमीवर विशेष सत्र असलेल्या आठवड्यात बाजाराचा विक्रमी उच्चांक

मुंबई, दि. 3 (जितेश सावंत) :दिनांक 01 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारतीय बाजाराने मागील आठवड्यातील तेजीला पुढे नेत नवा विक्रम रचला. तसेच शनिवारी 2 मार्च रोजी विशेष ट्रेडिंग सत्रात शेअर बाजारात खरेदीचे वातावरण होते आणि निफ्टी पुन्हा एकदा सर्वोच्च पातळीवर बंद झाला. निफ्टीने 22462 चा उच्चांक गाठला, तर सेन्सेक्सने 74220 चा उच्चांक गाठला.

उत्कृष्ट Q3 GDP आकडे, उत्पादन क्षेत्राची चांगली कामगिरी आणि मजबूत कार विक्रीचे आकडे ,इन-लाइन यूएस चलनवाढीचे आकडे आणि त्यामुळे पुन्हा एकदा दर कपातीची आशा जिवंत झाल्याने यामुळे बाजारातील उत्साह वाढला. त्यामुळे शेअर बाजाराने नवे उच्चांक प्रस्थापित केले. Markets rallied on positive GDP data, auto sales, and US inflation numbers, boosting hopes for another rate cut.

पुढील आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष प्रामुख्याने यूएस फेडरल रिझर्व्हचे अर्धवार्षिक चलनविषयक धोरण (US Federal Reserve chairman Jerome Powell’s testimony) ,मासिक जागतिक उत्पादन PMI डेटा monthly global services PMI numbers, ECB interest rate decision, third estimates for Euro zone GDP numbers for Q3CY23,चीनची महागाई (China’s inflation.)यूएस नोकऱ्यांचा डेटा, बेरोजगारीचा दर (The US jobs data, unemployment rate and factory orders) विदेशी गुंतवणूकदारांची भूमिका (FII Flow) आणि तेलाच्या किमती (Oil Prices) याकडे राहील.

Technical view on nifty-

शनिवारी निफ्टीने 22419.5 चा नवा विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टीने 22378.4चा बंद भाव दिला.निफ्टी साठी 22343-22297-22297-22278 हे महत्वाचे सपोर्ट
(Support) आहेत हे तोडल्यास निफ्टी 22239.80-22,297-22212.7-22183.30-22126-22040.7-22018-21962 हे स्तर गाठेल.तर वरच्या स्तरावर निफ्टी साठी 22389-22440-22462 हे रेसिस्टन्स (Resistance) ठरतील.

सेन्सेक्समध्ये 353 अंकांची घसरण

अत्यंत अस्थिर अश्या सत्रात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजारात घसरण पाहावयास मिळाली.समिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर, बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. गुंतवणूकदारांकडून जोरदार नफावसुली दिसून आली. दुपारनंतर पॉवर आणि कॅपिटल गुड्स स्टॉकमधील खरेदीमुळे बाजाराला इंट्राडेचे काही नुकसान भरून काढण्यास मदत झाली. सेन्सेक्स 73,000 च्या खाली घसरला. Sensex down 353 points
निफ्टीने 22,200 चा टप्पा पार केला.

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी बाजाराची सुरुवात सपाट परंतु काहीशी नकारात्मकतेकडे झुकलेली झाली.अस्थिर अश्या सत्रात खालच्या स्तरावरून बाजाराने हळूहळू बढत घेतली.ऑटो, कॅपिटल गुड्स, आयटी आणि रिॲल्टी समभागातील जोरदार खरेदीमुळे निफ्टीने 22,200 चा टप्पा पार केला. The Nifty has crossed the 22,200 mark.

सेन्सेक्स 790 अंकांनी तर निफ्टी 22,000 च्या खाली
बुधवारी मंथली एक्सपायरी आणि जीडीपी डेटा जाहीर होण्याअगोदर सर्व क्षेत्रांमध्ये चौफेर विक्री झाल्याने बाजारात एक टक्क्यांहून अधिक घसरण झाली.सेन्सेक्स 800 अंकांपेक्षा जास्त गडगडला.स्मॉल आणि मिडकॅप्सला सर्वात जास्त फटका बसला.निफ्टी निर्देशांक 22,000 च्या खाली गेला. निर्देशांकात हेवी वेट असलेल्या शेअर्सची कमकुवत कामगिरी,आणि फायनांशीअल शेअर्स मधील जोरदार घसरण हे बाजारातील घसरणीचे प्रमुख कारण ठरले. बाजारातील घसरण इतकी तीव्र होती की सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त 4 शेअर्स वाढीसह बंद झाले. Sensex tanks 790 points, Nifty below 22,000

बाजार किरकोळ वाढीसह बंद
गुरुवारी मंथली एक्सपायरीच्या (F&O) आणि अस्थिर अश्या दिवशी बाजार किरकोळ वाढीसह बंद झाला आणि आदल्या दिवशीच्या घसरणीतून सावरला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फायनान्शियल कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्यामुळे निफ्टीने जवळपास 22,000 चा स्तर गाठला.Market ends with modest gain amid high volatility

मार्च सिरीजची सुरुवात धमाकेदार

शुक्रवारी निफ्टी मार्च सिरीजची सुरुवात जोरदार झाली. संपूर्ण दिवस बाजाराने ही तेजी वाढवत नेली आणि बाजाराने नवा विक्रमी उच्चांक गाठला. अपेक्षेपेक्षा चांगला GDP डेटा, ऑटो विक्री संख्येतील सुधार आणि इन-लाइन यूएस चलनवाढीचे आकडे व त्यामुळे पुन्हा एकदा दर कपातीची आशा जिवंत झाल्याने बाजाराने मोठी उसळी घेतली.दोन्ही निर्देशांक प्रत्येकी दीड टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स 1300 अंकांनी वधारला.
Markets Kick Start March on a High

(लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत)

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
3 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *