आरक्षण प्रश्नावरील सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीचा बहिष्कार
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मुंबईत अधिवेशन कालावधीत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आंदोलनाला भेट देऊन काय चर्चा केली आहे हे राज्यातील जनतेला कळले पाहिजे. या प्रकरणी राज्य सरकारने विरोधकांना विश्वासात न घेतल्याने महाविकास आघाडीने आज बैठकीवर बहिष्कार घातला .
राज्य शासनाने आरक्षणप्रश्नी त्यांची भूमिका सभागृहात स्पष्ट करावी अशी मागणी विधासभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत तर अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत केली..
राज्यात आरक्षण प्रश्नावर आंदोलन सुरू असताना आंदोलकांसोबत केलेली चर्चा,दिलेले आश्वासन शासनाने सभागृहात मांडावे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची नेमकी काय चर्चा झाली होती,ती राज्यातील जनतेला कळली पाहिजे.आरक्षण प्रश्नी शासनाने दोन्ही समाजाचे समाधान होईल असा तोडगा काढावा,सरकारने न्याय देण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे.
ML/ML/SL
9 July 2024