चौदा तारखेला अजितदादा फोडणार निवडणुकीचा नारळ
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीत अपयश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह आगामी विधानसभा निवडणुकासाठी मंगळवारी सिद्धिविनायकाला साकडे घातले आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ बारामती मध्ये येत्या १४ तारखेला फोडणार आहेत.
येत्या 14 जुलै रोजी बारामतीमध्ये अजित पवारांच्या पक्षाची पहिली सभा बारामतीत होणार आहे, या सभेद्वारे ते विधानसभेचे रणशिंग फुंकणार आहेत. आता आम्ही पुढच्या कामाला म्हणजे विधानसभेच्या तयारीला लागण्यास मोकळे झालो असे अजित पवार यांनी सांगितले . आजचा दिवस’ अतिशय महत्वाचा आहे. आज मंगळवार असल्याने दर्शनासाठी आजचा दिवस ठरवला होता. आम्ही सर्वांनी एकत्र दर्शन घेतले. चांगल्या कामाची सुरुवात देवाचे दर्शन घेऊन केली जाते. आम्ही आता पुढच्या कामाला लागणार आहोत. जनतेने आम्हाला आशीर्वाद द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली . लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आता सामोरे जाणार असल्याचे पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, ”14 तारखेली पहिली सभा बारामतीमधून सुरू करणार आहोत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काय निर्णय घेतले? कुठल्या योजना दिल्या? त्या लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. पुढे वाटचाल करताना विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जाणार आहे. याची सुरुवात आज दर्शनाने केली असेही ते म्हणाले . Ajitdada will break the coconut of the election on the 14th
ML/ML/PGB
9 July 2024