कर्नाटक सरकारच्या जुलमी अत्याचाराविरुद्ध महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा
मुंबई दि.28( एम एमसी न्यूज नेटवर्क) : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर ,भालकी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीसाठी आज बेळगाव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मुंबई च्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.
गेल्या 66 वर्षापासून कर्नाटक सरकारच्या जुलमी अन्याय अत्याचाराविरुद्ध सीमा भागातील मराठी भाषिक लोकशाहीच्या मार्गाने लढत आहे. मराठी भाषिकांची महाराष्ट्रात विलीन होण्याची तळमळ तितक्याच तीव्रतेची आजही आहे. महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील लोकांच्यासाठी अनेक कल्याणकारी योजना अमलात आणल्या तरीही तो भाग महाराष्ट्रात विलीन झाल्यावरच तेथील जनतेचा खऱ्या अर्थाने विकास होईल.तेव्हा लवकरात लवकर सीमा प्रश्न सुटवा व सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय द्यावा , या मागणीसाठी हजारो सीमा वासिय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.
25 लाख लोक आजही कर्नाटकाच्या जोखडात अडकून
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली परंतु बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी असा 25 लाख लोकांचा सीमा भाग आजही कर्नाटकाच्या जोखडात अडकून पडले आहेत. येथील मराठी भाषिकांची एवढीच मागणी आहे की आम्हाला आमच्या मातृभाषेच्या राज्यात राहायचं आहे, हा प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाहीतील आंदोलने, मोर्चे,उपोषणे, सत्याग्रह ,साखळी उपोषण, धरणे आंदोलन, पायी मोर्चा,मोटरसायकल फेरी, साराबंदी अशी अनेक आंदोलने करत 2004 रोजी हा प्रश्न सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आला. परंतु अजून सीमावासियांना न्याय मिळाला नाही.
या आमदारांनी घेतली आंदोलकांची भेट
महाराष्ट्रातील सरकारने हा सीमा प्रश्न लवकरात लवकर सोडून सीमा भागातील नागरिकांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा यासाठी सीमा भागातील नागरिक या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.या धरणे आंदोलनाला महाराष्ट्राचे आमदार भास्कर जाधव, वैभव नाईक,रोहित पवार,अतुल बेनके,बालाजी किणीकर, भरत गोगावले, माजी मंत्री छगन भुजबळ सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई, सीमा समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील,आदींनी आंदोलना भेट देऊन सीमावासीयामध्ये आंदोलनामध्ये भाग घेतला.
यावेळी शंभूराजे देसाई म्हणाले की, हा लढा अंतत्य अस्मितेने लढणारा लढा आहे. गेल्या अनेक वर्षे सीमा भागातील नागरिक आपल्या मातृभाषेच्या राज्यात येण्यासाठी लढा देत आहे, या लढ्याची जाणीव आम्हाला असून हा भाग लवकरात लवकर महाराष्ट्रात समावेश करण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करील असे ते म्हणाले.
माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, 1986 च्या कन्नड सक्ती आंदोलनामध्ये मी वेशांतर करून आंदोलनात भाग घेतला होता, पण आज 36 वर्ष सुलटली तरी सीमा भागातील नागरिक या लढ्यासाठी निष्ठेने लढत आहेत,खरं तर हा लढा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यासारखा आहे. तरी सीमा भागातील नागरिकांसाठी न्याय देण्यासाठी सहभाग घेऊन लढा संपवू .
यावेळी आमदार रोहित दादा पवार म्हणाले की मागच्या तीन महिन्यापूर्वी बेळगाव भेटीदरम्यान मी हुतात्मा स्मारक, येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भेट देली तसेच ज्योतिबा मंदिरला ही भेट देऊन सीमा लढ्यातील अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या,तेथील जनता ही सीमा भागात येण्यासाठी लढत आहेत आणि त्यांच्या लढ्यात आमचे पवार कुटुंबीय अत्यंत पहिल्यापासून सहभागी झाले आहेत. १९८६ साली कन्नड सक्ती आंदोलनात शरचंद्र पवार साहेब यांनीही सहभाग घेऊन या आंदोलनात कानडी पोलिसांची लाटी देखील खाल्ली होती. तेव्हा साऱ्या या लढ्याची जाणीव आम्हाला असून सीमा प्रश्न सुटला तरच या भाषिकांना न्याय मिळेल,तेव्हा महाराष्ट्रातील सर्व पक्षयाना ,गांभीर्याना लढ्याचे महत्त्व जाणून घेऊन येणाऱ्या काळात हा प्रश्न सोडून घेऊन मराठी अस्मिता टिकावेली पाहिजे.
यावेळी सीमा भागातील अँड सुधीर चव्हाण,माझी महापौर शिवाजी शंकर माझी महापौर सरिता पाटील, माझी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी,बिदर महाराष्ट्र एकीकर समितीची चिटणीस पृथ्वीराज पाटील, निपाणी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष जयराम मिरजकर, माझी महापौर शिवाजी सुंठकर,खानापूर महाराष्ट्र एकीकरण अध्यक्ष गोपाल तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले, लवकरात लवकर हा सीमा भाग महाराष्ट्रात सामील करून घ्यावा अशी विनंती महाराष्ट्र करण्यात आली.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलनाला भेट द्यावी
सरकारच्या वतीने सीमा समन्वयक मंत्री शंभूराजे देसाई ,चंद्रकांत पाटील यांनी धरणे आंदोलनात भेटीवेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा संदेश पोहोचविला. परंतु सीमा भागातील नागरिकांची एकच मागणी होती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धरणे आंदोलनात भेट देऊन सीमा वासीयांना पाठिंबा व्यक्त करावा अशी मागणी सीमावासियातून केली जात होती.
SW/KA/SL
28 Feb. 2023