अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

 अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

मुंबई,दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या गेल्या अनेक वर्षांच्या सुरू असलेल्या लढ्याला आज काही प्रमाणात यश आले आहे. राज्यातल्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या. आता अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार आहे.

राज्य सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर मानधन वाढवून देण्याबरोबरच अंगणवाडीसेविकांना मोबाईल फोन्सही दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरू केली जाणार आहे. कर्मचारी आणि सरकारच्या सहकार्याने ही योजना सुरू होणार आहे.

राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाला बसल्या होत्या. या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या प्रश्नांना तातडीने न्याय देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी यापूर्वी हिवाळी अधिवेशनाच्या वेळी आंदोलन केले होते. त्यावेळी दिनांक २६ जानेवारीपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र अजूनही त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने अंगणवाडी सेविकांनी आझाद मैदानात आंदोलन सुरू केले होते.

अजित पवार यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केल्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहोत. त्यानंतर अंगणवाडी सेविकांसोबत सरकारची चर्चा झाली आणि राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

SL/KA/SL

28 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *