मजुरांची वानवा आणि उताऱ्यात घट
सांगली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यात आत्तापर्यंत 73 लाख 26 हजार 60 मॅट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे , त्यातून 86 लाख 14 हजार 358 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
जिल्ह्यात सरासरी साखरेचा उतारा 11.53% झाले , दरम्यान आठवडाभरात गळीत हंगाम पूर्ण करण्याचे आव्हान या सर्व कारखान्यांपुढे आहे . ऊस तोडणी साठी यंत्रणा कमी पडू लागली असून मजुरांची चणचण बसू लागली आहे.
उताऱ्यातही यंदा घट आली असून गाळप हंगाम लांबणीवर पडला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस कारखाने सुरू ठेवावे लागणार आहेत.
ML/KA/SL
12 March 2023