एलआयसीकडे बेवारस पडून आहेत 21500 कोटी रुपये
नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडे सप्टेंबर 2021 पर्यंत 21,539 कोटी रुपयांचा असा निधी होता ज्याचा कोणीही दावेदार (unclaimed fund) नव्हते. एलआयसी ने भारतीय प्रतिभूति आणि विनिमय मंडळाकडे (SEBI) सादर केलेल्या प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव (IPO) दस्तऐवजातून ही माहिती प्राप्त झाली आहे.
एलआयसीच्या (LIC) कागदपत्रांनुसार, यात दावा न केलेल्या रकमेवरील व्याजाचाही समावेश आहे. त्यात म्हटले आहे की मार्च 2021 पर्यंत दावा न केलेला निधी 18,495 कोटी रुपये आणि मार्च 2020 अखेरीस 16,052.65 कोटी रुपये होता. त्याच वेळी, मार्च 2019 अखेर ही रक्कम 13,843.70 कोटी रुपये होती.
प्रत्येक विमा कंपनीला 1,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दावा न केलेल्या रकमेचा (unclaimed fund) तपशील त्याच्या संकेतस्थळावर द्यावा लागतो. संकेतस्थळावर विमाधारक किंवा लाभार्थ्यांना दावा न केलेल्या रकमेची पडताळणी करण्याची सुविधा देखील उपलब्ध करणे आवश्यक आहे.
इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDA) द्वारे परिपत्रकात दावा न केलेल्या रकमे संदर्भातील (unclaimed fund) प्रक्रियांचा तपशील देण्यात आला आहे, असे एलआयसी (LIC) ने दिलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे. या प्रक्रियांमध्ये दावा न केलेल्या रकमेचे पेमेंट, विमाधारकांना माहिती, लेखा आणि गुंतवणुकीच्या उत्पन्नाचा वापर इत्यादींचा समावेश आहे.
The Life Insurance Corporation of India (LIC) had a fund of Rs 21,539 crore till September 2021, of which no claimant was available. This information was obtained from the initial public offering (IPO) document submitted by LIC to the Securities and Exchange Board of India (SEBI).
PL/KA/PL/17 FEB 2022