एलआयसीने सेबीकडे सादर केली कागदपत्रे

 एलआयसीने सेबीकडे सादर केली कागदपत्रे

नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय जीवन विमा महमंडळाने सेबीकडे डीआरएचपी (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस) दाखल केला आहे. याचा अर्थ एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) या आर्थिक वर्षात येऊ शकतो. कागदपत्रांनुसार, सरकार आयपीओद्वारे एलआयसीमधील सुमारे 5 टक्के हिस्सेदारी विकण्याची तयारी करत आहे. सरकार 6.32 अब्ज समभागांपैकी सुमारे 31.6 कोटी समभाग विकणार आहे. त्याची दर्शनी किंमत 10 रुपये आहे. या आयपीओ द्वारे मिळणारे सर्व पैसे एलआयसीकडे न जाता सरकारी तिजोरीत जातील, कारण कंपनीकडून कोणतेही नवीन समभाग जारी केले जात नाहीत.

एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) सरकारला 78,000 कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे सुधारित उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल. यापूर्वी हे लक्ष्य 1.75 लाख कोटी रुपये होते. आतापर्यंत सरकारने निर्गुंतवणुकीद्वारे सुमारे 12,000 कोटी रुपये उभे केले आहेत. सध्या एलआयसीमध्ये सरकारची 100 टक्के हिस्सेदारी आहे, परंतु या आयपीओ नंतर सरकार्कडे 95 टक्के हिस्सेदारी शिल्लक राहील.

या आयपीओ मधील 50 टक्के समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव आहेत. सुमारे 15 टक्के समभाग बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील. 35 टक्के समभाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील. या आयपीओ मधील काही समभाग एलआयसी कर्मचारी आणि विमाधारकांसाठी देखील राखीव असतील. एलआयसी (LIC) चा हा आयपीओ भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ असेल. या आयपीओ मधून एलआयसी मधील 5 टक्के हिस्सेदारी विकून सरकार 66,000 कोटी रुपये उभे करेल अशी अपेक्षा आहे.

 

काही वृत्तानुसार, सरकार एलआयसी आयपीओचा (LIC IPO) चा एक भाग विमाधारकांसाठी ठेवण्याचा विचार करत आहे. तसेच, एलआयसीच्या विमाधारकांना आयपीओ मध्ये सूट देखील मिळू शकते. एलआयसी विमाधारकांना 5 टक्के सूट देऊ शकते. देशात एलआयसीचे लाखो विमाधारक आहेत आणि अशा प्रकारे त्यांना एलआयसीचे समभाग सवलतीत मिळण्याची संधी मिळू शकते. यामागील एक कारण म्हणजे सरकारला मोठ्या प्रमाणात किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करायचे आहे. यासोबतच या आयपीओ मधील विदेशी गुंतवणूक 20 टक्क्यांवर नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, जेणेकरून आयपीओला मोठे यश मिळू शकेल.

Life Insurance Corporation of India has filed DRHP (Draft Red Herring Prospectus) with SEBI. This means that LIC IPO may come in this financial year. According to documents, the government is preparing to sell about 5 per cent stake in LIC through an IPO. The government will sell about 31.6 crore shares out of 6.32 billion.

PL/KA/PL/14 FEB 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *