एलआयसीच्या आयपीओला या कारणामुळे विलंब ?
नवी दिल्ली, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) आयपीओ (IPO) चालू आर्थिक वर्षात येण्याची शक्यता कमी आहे. कारण त्याच्या मूल्यांकनात अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. आयपीओ आणण्याच्या तयारीत असलेल्या एका मर्चंट बँकरच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, या मोठ्या कंपनीच्या मूल्यांकनाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही आणि त्यासाठी आणखी काही कालावधी लागू शकतो. मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्यानंतरही आयपीओशी संबंधित अनेक नियामक प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागेल.
मात्र दिपम चे (DIPAM) सचिव तुहिन कांत पांडे यांनी एका ट्विटमध्ये दावा केला आहे की एलआयसीच्या (LIC) आयपीओ (IPO) संदर्भात तयारी सुरू आहे आणि तो 2021-22 च्या जानेवारी-मार्च या तिमाहीत आणला जाईल. पांडे यांचे म्हणणे आहे की चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत तो आणण्याची तयारी झाली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयपीओ (IPO) आणण्यापूर्वी बाजार नियामक सेबीची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. याशिवाय विमा क्षेत्राची नियामक संस्था आयआरडीएआयची (IRDAI) देखील त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. आयआरडीएआय प्रमुखाचे पद जवळपास सात महिन्यांपासून रिक्त आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, अशा परिस्थितीत एलआयसीचा (LIC) आयपीओ 2021-22 या आर्थिक वर्षात येण्याची शक्यता खूपच कमी आहे. आता या आर्थिक वर्षात केवळ तीन महिने उरले आहेत.
एलआयसीचे (LIC) मूल्यांकन ही एक अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. याचे कारण म्हणजे एलआयसीचा आकार खूप मोठा आहे. त्याच्याकडे रिअल इस्टेट मालमत्ता आहे. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, मूल्यांकनाचे काम पूर्ण होईपर्यंत समभाग विक्रीचा आकारही ठरवता येणार नाही.
चालू आर्थिक वर्षातच एलआयसीचा आयपीओ आणण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. खरे तर, या आर्थिक वर्षात 1.75 लाख कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट गाठण्यात हा आयपीओ अतिशय महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. याशिवाय, सरकारला बीपीसीएलच्या धोरणात्मक विक्रीतूनही मोठ्या आशा आहेत. अलीकडेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते की, सरकार निर्गुंतवणुकीच्या दिशेने चांगली वाटचाल करत आहे. त्यांनी सांगितले होते की नोकरशाही आणि विविध विभागांतील त्रुटी दूर करण्यासाठी वेळ लागतो, परंतु सरकार ते वेगाने करण्याचा प्रयत्न करत आहे.
Life Insurance Corporation of India (LIC), the country’s largest insurance company, is unlikely to have an IPO in the current financial year. Because its evaluation is taking longer than expected. A senior official at Merchant Banker, which is preparing to launch an IPO, says the valuation of the large company has not yet been completed.
PL/KA/PL/20 DEC 2021