आषाढी एकादशी निमित्त भाजी मार्केटमध्ये शेंगा व रताळ्याची मोठी आवक …

 आषाढी एकादशी निमित्त भाजी मार्केटमध्ये शेंगा व रताळ्याची मोठी आवक …

औरंगाबाद, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आषाढी एकादशी निमित्त  on the occasion of Ashadi Ekadashi … औरंगाबाद येथील जाधववाडी भाजी मंडी मध्ये शेंगा व रताळ्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे.

आषाढी एकादशीला सर्वच हिंदू धर्मीय उपास ठेवतात या उपासाला शेंगा , रताळे, बटाटे यांचे भाव इतर दिवस स्थिर राहतात मात्र तीन दिवसांमध्ये सध्या वाढलेले दिसत आहेत.

यावर्षी शेंगा व रताळे यांचे दहा ते पाच रुपयांनी भाव वाढले आहे पूर्वी रताळी 30-35 रुपये किलो विकायची आता 45 ते 47 रुपये भाव झालेला आहे शेंगाही 35 40 रुपये किलो होते आता 50 ते 60 रुपये किलो विक्री होत आहे आणि येणाऱ्या दोन दिवसांमध्ये ही आणखी भाव वाढू शकतात अशी शक्यता ठोक व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.Large influx of groundnuts and sweet potato in the vegetable market

चिल्लर व्यापारी ठोक माल घेऊन रताळे 50 ते 60 रुपये किलो तर शेंगा 70 ते 80 रुपये किलो पर्यंत विक्री करत आहे. येणाऱ्या दोन दिवसांमध्ये आणखी शेंगा ,रताळे ,बटाटे यांची आवक वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ML/KA/PGB
8 July 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *