भांडवली बाजारात (Stock Market) ३ टक्क्यांनी वाढ

 भांडवली बाजारात (Stock Market) ३ टक्क्यांनी वाढ

मुंबई, दि. 09 (जितेश सावंत) : जागतिक बाजारातील मिळालेले सकारात्मक संकेत,FII च्या विक्रीतील घट, कमोडिटीची घसरण, कच्च्या तेलाच्या खाली आलेल्या किमती,वीकली एक्सपायरीच्या यामुळे गेला आठवडा बाजारासाठी चांगला राहिला. बाजार ३% वाढला.निफ्टी ५० ने १६,०००चा मनोवैज्ञानिक टप्पा ओलांडला. गुरुवारी एक महिन्यानंतर FII भारतीय बाजारात नेट बायर राहिले. परंतु रुपयातील घसरण ही गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब आहे. रिझर्व्ह बँकेने बुधवारी देशातील विदेशी गुंतवणूक सुधारण्यासाठी आणि गेल्या काही आठवड्यांमध्ये लक्षणीय घसरलेल्या रुपयाला पाठिंबा देण्यासाठी अनेक उपायांची घोषणा केली.3% growth in the stock market

पुढील काळात Q1 तिमाही निकाल बाजारासाठी केंद्रबिंदू असेल

तांत्रिकदृष्ट्या नमूद केल्याप्रमाणे निफ्टीने १६,२००चा टप्पा पार केला आहे. बाजार थोडा ओव्हरबॉट झोन मध्ये असल्याने गुंतवणूकदारानी सावधानता बाळगावी. येणाऱ्या काळात निफ्टी १६,३००-१६,५०० चा टप्पा पार करेल. खालच्या स्तरावर निफ्टीला १५,८०० चा सपोर्ट आहे.

पहिल्याच दिवशी बाजारात तेजी
तीन दिवसांच्या पडझडीनंतर आठवडयाच्या पहिल्याच दिवशी बाजारात तेजी पाहावयास मिळाली. FMCG व बँकिंग समभागागातील खरेदीमुळे बाजारात वाढ झाली. मजबूत सुरुवातीनंतर, संपूर्ण सत्रात निर्देशांक वर व खाली असा झुलत राहिला परंतु शेवटच्या तासातील खरेदीमुळे बाजाराला दिवसाच्या उच्चांकाच्या जवळ बंद होण्यास मदत झाली.स्मॉल कॅप व मिडकॅप समभागात देखील चांगली खरेदी झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ३२६ अंकांनी वधारून ५३,२३४ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ८३ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १५,८३५ चा बंददिला.

Market squanders day’s gains
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी संमिश्र आशियाई संकेत असूनही, भारतीय बाजाराची सुरुवात चांगली झाली आणि दिवस जसजसा वाढत गेला तसतशी नफ्यात वाढ झाली. सेन्सेक्सने ५५० अंकांची उसळी घेतली,परंतु दुपारनंतर विक्रीमुळे सगळा नफा नष्ट झाला आणि बेंचमार्क लाल रंगात बंद झाले.अलिकडच्या आठवड्यात बाजार प्रचंड प्रमाणात स्विंग होणे हि नित्याचीच बाब झाली आहे. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स १०० अंकांनी घसरून ५३,१३४ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत २४ अंकांची घसरून होऊन निफ्टीने १५,८१० चा बंददिला.
जागतिक बाजाराचा कल सध्या मंदीच्या आसपास सूचित करतो तसेच चलनविषयक धोरण कडक केल्याने सुद्धा गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासाला धक्का बसत आहे. डॉलर इंडेक्स झपाट्याने वाढत असल्याने उदयोन्मुख चलनांच्या कामगिरीवर परिणाम होत आहे तसेच दिवसेंदिवस रुपयाचे देखील अवमूल्यन होत आहे.

सेन्सेक्स ६०० अंकांपेक्षा अधिक वाढला .Sensex gains over 600 pts
संमिश्र जागतिक संकेतांच्या पार्श्वभूमीवर ,भारतीय बाजाराची सुरुवात सकारात्मकतेने झाली आणि संपूर्ण सत्रात ती सकारात्मक स्थितीत राहिली.कच्च्या तेलाच्या किमती पडल्याने,तसेच FII कडून खरेदी झाल्याने ,विकली एक्सपायरीच्या अगोदरच्या दिवशी बाजारात जोश होता.निफ्टीत शानदार तेजी झाली. निफ्टीने चार आठवड्याच्या वरती बंद दिला. ऑटो आणि एफएमसीजी(Auto and FMCG ) निर्देशांक प्रत्येकी २.६ टक्के वाढले आणि माहिती तंत्रज्ञान आणि पीएसयू बँक(Information Technology and PSU Bank) निर्देशांक प्रत्येकी १ टक्के वाढले, तर काही धातू(Metal) समभागांमध्ये विक्री दिसून आली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ६१६ अंकांनी वधारून ५३,७५० वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १७८ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १५,९८९चा बंददिला.
निफ्टीने 16,000 चा टप्पा पार केला. Nifty breaches 16,000 mark
गुरुवारी वीकली एक्सपायरीच्या दिवशी अनेक दिवसांच्या अस्थिरतेनंतर, गुरुवारी वीकली एक्सपायरीच्या दिवशी निफ्टी५० ने १६,०००चा मनोवैज्ञानिक टप्पा ओलांडला त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी बाजार हिरव्या रंगात राहिला.निफ्टी मिडकॅप १०० आणि स्मॉलकॅप १०० निर्देशांक प्रत्येकी १.३ टक्क्यांहून अधिक वाढले.तेलाच्या किमतीत झालेली घसरण,सकारात्मक जागतिक संकेत,फेड मिनिट्स, रिझर्व्ह बँकेने बुधवारी देशातील विदेशी गुंतवणूक सुधारण्यासाठी आणि गेल्या काही आठवड्यांमध्ये लक्षणीय घसरलेल्या रुपयाला पाठिंबा देण्यासाठी अनेक उपायांची घोषणा केली.या सगळ्याचा एकत्रित परिणाम बाजारावर दिसला. सेन्सेक्समध्ये ४०० अंकातून अधिक वाढ झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ४२७ अंकांनी वधारून ५४,१७८ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत १४० अंकांची वाढ होऊन निफ्टीने १६,१३३ चा बंददिला.
फेडरल रिझर्व्हच्या अधिकार्यांनी ५०-७५ bps ची आणखी एक वाढ महागाई नियंत्रणासाठी योग्य असल्याचे सांगितले परंतु जागतिक बाजारपेठेने ही बाब सध्या तरी पचवली आहे.

सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी.Market gains for third day
आठवडयाचा शेवटचा दिवस तेजीच्या हॅट्ट्रिक ने बंद झाला. भारतीय बेंचमार्क निर्देशांक ८ जुलै रोजी सलग तिसऱ्या दिवशी उच्च पातळीवर बंद झाले, कॅपिटल गुड्स तसेच पॉवर स्टॉकमधील खरेदी आणि तेलाच्या किमतीतील घसरण यामुळे केल्यामुळे बाजार वधारला. तसेच गेल्या आठवडयाच्या तुलनेत विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री कमी झाल्याने बाजाराला आधार मिळाला. मेटल वगळता, सर्व क्षेत्रे हिरव्या रंगात बंद झाली . बँक, ऊर्जा, फार्मा आणि एफएमसीजी निर्देशांक ०.५-१ टक्क्यांनी वाढले.येणाऱ्या काळात Q1 कमाईचा हंगाम (तिमाही निकाल) बाजारासाठी केंद्रबिंदू असेल. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ३०३ अंकांनी वधारून ५४,४८१ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीत ८७ अंकांची वाढ होऊन निफ्टीने १६,२२० चा बंददिला.
(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.)

jiteshsawant33@gmail.com

JS/KA/PGB
9 July 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *