कलिंगड आईस्क्रीम

 कलिंगड आईस्क्रीम

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

साहित्य :-

१. दूध – अर्धा लिटर
२. साखर – १ कप
३. बेकिंग सोडा – १/२ टेबलस्पून
४. कलिंगड – २ कप (बिया काढून घेतलेले- फक्त लाल भाग घ्यावा)
५. मिल्क पावडर – अर्धा कप
६. लाल रंगाचा फूड कलर – चिमूटभर (पर्यायी)

कृती :-

१. सर्वप्रथम एका पॅनमध्ये दूध ओतून त्यात साखर घालूंन हे मिश्रण मंद आचेवर साखर संपूर्ण विरघळेपर्यंत चमच्याने ढवळत राहा.
२. मिश्रण थोडं घट्टसर उकळून आल्यावर त्यात बेकिंग सोडा घालावा. हे मिश्रण थोडं दाटसर होईपर्यंत चमच्याने ढवळत राहावे.
३. आता एका मिक्सरच्या भांड्यात मिल्क पावडर घेऊन त्यात कलिंगडाचा लाल गर काढून घ्यावा. (बिया संपूर्णपणे काढून टाकाव्यात आणि फक्त कलिंगडाचा लाल भाग वापरावा.)
४. मिल्क पावडर व कलिंगडाचा गर यांची एकत्रित मिक्सरला पातळसर पेस्ट बनवून घ्यावी.

५. कलिंगड आणि मिल्क पावडरच्या एकत्रित वाटून घेतलेल्या मिश्रणात, साखर आणि दूध वापरून घट्टसर तयार केलेलं मिश्रण ओतावे. (आपल्या आवडीनुसार लाल रंगाचा फूड कलर घालावा. फूड कलरचा वापर करणे हे पर्यायी आहे.) हे दोन्ही मिश्रण एकजीव करुन मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
६. आता हे मिक्सरमधील आईस्क्रीमचे तयार मिश्रण आईस्क्रीमच्या साच्यात ओतावे किंवा मोठ्या बाऊलमध्ये ओतून फ्रिजमध्ये रेफ्रिजरेट होण्यासाठी ठेवावे.
७. ८ ते १० तासानंतर रेफ्रिजरेट केलेले आईस्क्रीम खाण्यासाठी व्यवस्थित तयार होईल.

ML/ML/PGB 10 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *