गडकरी धमकी प्रकरणी जयेश पुजारीला अटक

 गडकरी धमकी प्रकरणी जयेश पुजारीला अटक

कोल्हापूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना अधून मधून धमकीचे फोन करणाऱ्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांता याला आज बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगातून नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बेळगाव इथल्या हिंडलगा तुरुंगात सध्या शिक्षा भोगत असलेल्या जयेश पुजारी ऊर्फ जयेश कांथा असं धमकीचे फोन करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.
‘गुगल पे’वर 10 कोटी पाठवा आणि पोलिसांना सांगू नका, अशा आशयाचा फोन बेळगावच्या तुरुंगातील या कुख्यात आरोपीने दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात केला होता.

त्याने यापूर्वी 14 जानेवारी 2023 रोजी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयात तीन फोन केले होते. त्यावेळी त्याने डी गँगचा सदस्य असल्याचे सांगत 100 कोटींची मागणी केली होती. हा फोन बेळगावच्या तुरुंगातून आल्याचे निष्पन्न झाले होते.केंद्रीय एजन्सी आणि पोलिसांनी गडकरींच्या सुरक्षेचे निरीक्षण करून सुरक्षा वाढविली होती.

या प्रकरणात नागपुरातल्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याची धमकी तसेच खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ML/KA/SL

28 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *