आपल्यासाठी मातोश्री चे दरवाजे उध्दव ठाकरे यांनीच बंद केले आहेत
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपल्याला कसेही करून अडकवण्याचा प्रयत्न केला गेला आणि मातोश्रीचे दरवाजे उध्दव ठाकरे यांनीच आपल्यासाठी बंद केले तरीही माझा त्यांच्यावर कोणताही वैयक्तिक आकस नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
एका खासगी वाहिनीच्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्ट केले.आपल्याला हर प्रकारे अडकवून अटक करण्याचे आदेश तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आले होते मात्र आपण कशातच सापडलो नाही असे ते म्हणाले.
मातोश्री आणि उध्दव ठाकरे यांच्याशी माझी कोणतीही वैयक्तिक दुष्मनी अथवा आकस नाही मात्र त्यांनीच माझे फोन घेतले नाहीत आणि आपले दरवाजेच बंद केले आहेत, तरीही आज पण मी त्यांच्याशी बोलू शकतो , चहा पिऊ शकतो असेही फडणवीस म्हणाले.
मराठवाडा विद्यापीठ नामांतर , मण्डल आयोग अमलबजावणीसाठी उघड विरोध असणाऱ्या शिवसेनेशी आता बाळासाहेब आंबेडकर यांना युती करावीशी वाटते यावरून केवळ भाजपा विरोध आहे हे स्पष्ट होते असे सांगत त्याचा कोणताही फारसा परिणाम आमच्यावर होणार नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
ML/KA/SL
24 Jan. 2023