भांडवली बाजारातील(शेअर मार्केट) तेजीला खीळ, गुंतवणूकदारांचे लक्ष विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे.

  भांडवली बाजारातील(शेअर मार्केट) तेजीला खीळ, गुंतवणूकदारांचे लक्ष विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे.

मुंबई, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजारात खूप तेजी होती,परंतु चार  दिवसांच्या तेजीनंतर शुक्रवारी बाजारात  १००० अंकांची घसरण झाली. या आठवड्यात बाजारावरती लसीकरणाचा वेग,अमेरिकन प्रशासनाने कच्चा माल उपलबध करून देण्याचे आश्वासन,कोरोनाची उच्चतम पातळी लवकरच गाठली  जाईल हा आशावाद,अमेरिकन सेंट्रल बँकेचा निर्णय,मंथली एक्सपायरी,दिग्गज कंपन्यांचे निकाल,शनिवारी जाहीर होणारे वाहन क्षेत्रातील कंपन्यांचे विक्रीचे आकडे,  एक्सिट पोलचे अंदाज  आणि  २ मे रोजी जाहीर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल या सगळ्याचा प्रभाव दिसला.
 
 
आशियाई बाजारातून आलेले तेजीचे संकेत
Markets bounced back supported by positive global cues
 
कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस नोंद होत असलेली विक्रमी संख्या,विदेशी गुंतवणूकदारांची बाजारात होत असलेली विक्री या सगळ्याकडे दुर्लक्ष करून सोमवारी सकाळी बाजाराने आशियाई बाजारातून आलेले तेजीचे संकेत घेतले. बाजारात उत्साहाचे वातावरण होते,१८ वर्षावरील लसीकरणामुळे परिस्थिती नियंत्रणात येईल हा आशावाद,महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत होत असलेली घट खास करून मुंबईमधील, तसेच अमेरिकन प्रशासनाने लसीचा कच्चा माल त्वरित उपलब्ध करून देण्याबद्दलचे  आश्वासन.(US says it will provide India with raw material for vaccines)
यामुळे सोमवारी मार्केटमध्ये चांगलीच तेजी होती  सेन्सेक्सने ७०० अंकांची उसळी मारली. गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी केली. बँकिंग क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरूच होता. आयसीआयसीआय बँक(ICICI Bank), ऍक्सिस बँक (AXIS Bank),स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) या समभागात चांगली खरेदी झाली. मेटल सेक्टर मध्ये ही  खरेदीचा ओघ होता Markets bounced back on Monday  supported by positive global cues, strong earnings from ICICI Bank and initial signs of a possible slowdown in COVID-19 infections. Buying was seen in realty, metal, banks, and energy stocks. Investors booked profit in the pharma counters.
 
बाजारात तेजी,निफ्टीने गाठला १४,६०० चा स्तर
Market closed in green Nifty back above 14,600
 
सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी मार्केटची सुरुवात अत्यंत उत्साहवर्धक झाली. आय.टी(I.T) व फार्मा(Pharma) सेक्टरने मार्केटमध्ये अजून जोश भरला. निफ्टीने सकाळीच १४,५००चा टप्पा पार केला. दुपारनंतर निफ्टीने १४६५० चा स्तर पार केला. रिलायन्स(Reliance) व एच.डी .एफ सी बँक(HDFC Bank) या शेअर्स मध्ये देखील चांगलीच वाढ झाली व त्यांनी मार्केटला वरच्या स्तरावर पोहोचवण्यास मदत केली. मेटल(Metal) क्षेत्रातील शेअर्स सुद्धा चांगलेच चमकले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उच्चतम स्तर लवकरच  गाठला जाईल व त्यानंतर स्थिती सुधरेल अशी आशा बाजारला आहे. बाजार बंद होताना सेन्सेक्स ५५७ अंकांनी वाढून ४८,९४४ च्या स्तरावरती बंद झाला व निफ्टीने १६८ अंकांची वाढ घेऊन १४६५३ हा स्तर गाठला. Market closed in green with gains of over 1 percent for the second day in a row On Tusday, Led by the healthy buying in index heavyweights Reliance Industries and banking and financial counters.
 

भारतातील प्रवासी विमानांना ऑस्ट्रेलियात मज्जाव

Australia suspends passenger flights from India

मंगळवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारतात कोरोनाच्या  वाढत्या प्रसारामुळे  भारतातून थेट येणाऱ्या प्रवासी विमानांना १५ मे पर्यंत मज्जाव केल्याचे  त्वरित आदेश दिले असे  घोषित केले. Australia on Tuesday suspended all direct passenger flights from India with immediate effect until May 15 due to the “very significant” spike in COVID-19 cases, Prime Minister Scott Morrison announced.
 
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी.
Market ended higher for the third consecutive day in a row
 
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी होती. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पॉलिसीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारात मिश्र संकेत होते. निफ्टीने १४,८०० चा टप्पा पार केला बँकिंग सेक्टर मध्ये तेजी होती एच.डी .एफ सी बँक(HDFC Bank), आयसीआयसीआय बँक(ICICI Bank), स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) या समभागात चांगलीच तेजी होती. बुधवारी बजाज कंपन्यांच्या शेअर्सनी  कमालच केली, चवथ्या तिमाहीच्या निकालानंतर बजाज फिनसर्व (BAJAJ  FINSERV आणि बजाज फायनान्स (BAJAJ FINANCE) या समभागात ८ टक्क्यांनी वाढ झाली. तिमाहीच्या निकालाला बाजाराने सलामी दिली. लसीकरण मोहिम हळूहळू वेग घेत  असल्याने  बाजारावर तेजीवाल्यांनी चांगलीच पकड घेतली. सेन्सेक्स ७८९ अंकांनी वाढून  ४९७३३ ह्या स्तरावरती बंद झाला व निफ्टीने २११ अंकांची वाढ घेऊन १४८६४ च्या स्तरावरती बंद दिला. Market closed in the green for the third consecutive day in a row on Wednesday tracking positive global cues, optimism over COVID vaccine.
 
 
मार्केटमध्ये गुरुवारी तेजी, फेडरल रिझर्व्हने व्याजदर जैसे तेच ठेवले
The US Federal Reserve has kept interest rates unchanged
 
एप्रिल महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजेच मंथली एक्सपायरीच्या दिवसाची सुरुवात तेजीने झाली,सकाळी मार्केटने सुरु होताच ५७५ अंकांची उसळी घेतली व ५०२९२ ह्या स्तरावरती झेप घेतली तसेच निफ्टीने १६१ अंकांची उसळी घेऊन  १५,०२५ ह्या स्तरावरती झेप घेतली वरच्या स्तरावरती चांगलीच नफावसुली झाली.सलग चवथ्या दिवशी बाजारात तेजी होती ,१६ मार्च नंतर प्रथमच इंट्राडे मध्ये निफ्टीने १५,००० चा स्तर पार केला. सलग चवथ्या दिवशी बाजार वरच्या स्तरावरती बंद झाले. अमेरिकेची केंद्रीय बँक ,फेडरल रिझर्व्हने व्याजदर जैसे थेच ठेवल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. त्यांनी केलेल्या चौफेर खरेदीने भांडवली बाजारात मात्र तेजीची गुरुवारी बाजारात  खूपच उतार चढाव होता, सेन्सेक्स बंद होताना ५०,००० च्या खाली ४९७६५ च्या स्तरावरती  बंद झाला व निफ्टीने १४,८९५ चा बंद दिला. मेटल,ऑइल अँड गॅस तसेच हेल्केयर या क्षेत्रात खरेदी झाली. बाजाराचे लक्ष ५ राज्याच्या निवडणुकीच्या एक्सिट पोल कडे होते. Indian market closed in the green for the fourth consecutive day on Thursday. The Sensex close below the crucial psychological level of 50,000. Profit-booking . buying was seen in metals, energy, oil & gas, and healthcare stocks,
 

बाजारातील तेजीला खीळ सेन्सेक्स १००० अंकांनी खाली

Market snaps 4-day winning streak

 
शुक्रवारी सलग चार दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला. अमेरिकन मार्केट मध्ये गुरुवारी तेजी होती परंतु आशियाई  बाजार शुक्रवारी कमजोर होते.  मे महिन्याच्या वायदा बाजाराच्या पहिल्याच दिवशी बाजारात चांगलीच घसरण झाली, सकाळी मार्केट उघडताच सेन्सेक्स ४५० अंकांनी खाली आला,निफ्टीचा स्तर १४,८०० च्या खाली आला. बँकिंग क्षेत्रात प्रचंड घसरण झाली,एच.डी. एफ सी बँक(HDFC Bank), आयसीआयसीआय बँक(ICICI Bank),यांच्या समभागात ३ते ४ टक्क्यांची घसरण झाली, फार्मा शेअर्स तेजीत होते. डिव्हिस लॅब(Divis Lab) या समभागाने  आपला वर्षभरातील उचांक  नोंदवला. दुपारनंतर बाजारात प्रचंड दबाव होता सेन्सेक्स  १००० अंकांनी गडगडला Market snaps 4-day winning streak, pharma outperforms
 
 
 
२९  तारखेला जाहीर झालेल्या एक्सिट पोल (Exit Poll) नुसार वेस्ट बंगाल मध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात काटे कि टक्कर होणार असल्याचे दिसले, त्यामुळेही मार्केटवर थोडा दबाव आला.
 
 
या आठवड्यात मेटल शेअर्स(Metal Sector) मध्ये चांगलीच चमक होती,मागणी जास्त व पुरवठा कमी (More demand and less supply) यामुळे मेटल शेअर्स वाढले
तांत्रिक दृष्ट्या(technically) निफ्टीला १४२५० ह्या स्तरावरती चांगला सपोर्ट आहे.
(Investors’ attention is focused on the results of the Assembly elections.)
(मार्केट मध्ये गुंतवणूक करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा    )
जितेश सावंत
शेअर बाजार तज्ञ,
Technical and Fundamental Analyst-Stock Market
jiteshsawant33@gmail.com
GS/KA/PGB
1 MAY 2021

mmc

Related post