कोरोनामुळे एप्रिलमध्ये तेलाची मागणी घटली

 कोरोनामुळे एप्रिलमध्ये तेलाची मागणी घटली

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूची (corona virus) दुसरी लाट अधिक धोकादायक सिद्ध होत आहे आणि यामुळे देशातील बर्‍याच भागात टाळेबंदी (Lockdown) आणि रात्रीची संचारबंदी (Night Curfew) सारखे निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये तेलाची विक्री (Oil sale) कमी झाली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) (BPCL) चे संचालक (विपणन व शुद्धीकरण) अरुण सिंग यांच्या मते एप्रिल 2021 मध्ये तेलाची मागणी एप्रिल 2019 च्या तुलनेत 7 टक्के कमी होती. गेल्या वर्षी एप्रिल 2020 मधील टाळेबंदीमुळे, आर्थिक घडामोडी जवळजवळ बंद पडल्या होत्या, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तेलाच्या विक्रीच्या आकडेवारीची तुलना केल्यास योग्य चित्र समोर येणार नाही. विमानांची उड्डाणे पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत, त्यामुळे त्याची विक्री देखील कमी झाली आहे, मात्र घरगुती गॅस बाबतीत बोलायचे तर मार्च 2021 च्या तुलनेत एप्रिल 2021 मध्ये त्याची विक्री 3.3 टक्क्यांनी घटली आहे, परंतु एप्रिल 2019 च्या तुलनेत ती 11.6 टक्क्यांनी जास्त आहे.

ऑगस्ट 2020 नंतर एप्रिल 2021 मध्ये पेट्रोलची सर्वात कमी विक्री
The lowest sales of petrol in April 2021 after August 2020

सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल 2021 मध्ये 21.4 लाख टन पेट्रोल (Petrol) विकले गेले, जे ऑगस्टनंतरचे सर्वात कमी आहे. एप्रिल 2021 मध्ये, मागील आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना मार्च 2021 च्या तुलनेत 6.3 टक्के कमी आणि एप्रिल 2019 च्या तुलनेत 4.1 टक्के कमी पेट्रोल विकले गेले. एप्रिल 2020 मध्ये केवळ 8.72 लाख टन पेट्रोल विकले गेले होते.देशातील सर्वाधिक वापर होणारे इंधन डिझेलची (Diesel) विक्रीही घटून एप्रिल 2021 मध्ये ती 59 लाख टनांवर आली आहे, जी मार्च 2021 च्या तुलनेत 1.37 टक्क्यांनी आणि एप्रिल 2019 च्या तुलनेत 9.9 टक्के कमी आहे. एप्रिल 2020 मध्ये फक्त 28.4 लाख टन डिझेलची विक्री झाली होती.

एटीएफ आणि एलपीजीची विक्रीही कमी झाली
Sales of ATF and LPG also declined

कोरोना (corona) साथीमुळे विमान कंपन्यापूर्ण क्षमतेने उड्डाण करत नाहीत. यामुळे जेट इंधनाची (एटीएफ) (ATF) विक्रीही मार्च 2021 च्या तुलनेत 11.5 टक्क्यांनी घसरून 3.77 लाख टनांवर आली आहे. एप्रिल 2019 च्या तुलनेत 39.1 टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, एप्रिल 2020 मध्ये केवळ 5500 टन जेट इंधनाची (Jet Fuel) विक्री झाली होती.
एप्रिलमध्ये स्वयंपाकाचा गॅस एलपीजीची (LPG) विक्रीही कमी होती. मार्च 2021 च्या तुलनेत त्याची विक्री 3.3 टक्क्यांनी घसरून केवळ 21 लाख टनांवर आली, परंतु एप्रिल 2019 च्या तुलनेत 11.6 टक्क्यांनी अधिक झाली. एप्रिल 2019 मध्ये 18.8 लाख टन एलपीजीची विक्री झाली होती.
The second wave of corona virus is proving to be more dangerous and is leading to restrictions such as lockdowns and night curfews in many parts of the country. As a result, oil sales declined in April. According to Arun Singh, Director (Marketing and Refining), Bharat Petroleum Corporation Limited (BPCL), demand for oil in April 2021 was 7 per cent lower than in April 2019.
 
PL/KA/PL/3 MAY 2021

mmc

Related post