या दाक्षिणात्य राज्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना इंटरनेट मोफत

 या दाक्षिणात्य राज्यात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना इंटरनेट मोफत

थिरुवनंतपुरम, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळ सरकारने नुकतेच केरळ फायबर ऑप्टिकल नेटवर्क (KFON) नावाची योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आपल्या पहिल्याच कार्यकाळात महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे केरळ हे सर्वांना इंटरनेटचा मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य बनले आहे. राज्यातील सर्व घरांना आणि सरकारी कार्यालयांना वेगवान ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा देऊन डिजिटल भेदभाव दूर करण्याचा प्रयत्न पिनराई यांनी केला आहे. ई गव्हर्नन्स योजनांमध्ये वाढ करणे आणि ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था बनविण्याकडे केरळने मार्गक्रमण केले आहे.

केएफओएन हे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या माध्यमातून संपूर्ण केरळमध्ये ३० हजार किमीचे केबल नेटवर्क आणि ३७५ पॉइंट ऑफ प्रेझेन्स उभारले जाणार आहेत. केएफओएनच्या पायाभूत सुविधा या सर्व्हिस प्रोव्हाइडर, केबल ऑपरेटर्स यांना उपलब्ध करून दिल्या जातील. केएफओएन सरकारी कार्यालयांसाठीही इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्य सरकार ३० हजार शासकीय कार्यालयांना आणि दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या १४ हजार कुटुंबांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. ५ जून रोजी १७,४१२ शासकीय कार्यालये, २,१०५ घरांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात आली. तर केबल नेटवर्कच्या माध्यमामुळे आणखी ९ हजार घरांना इंटरनेट उपलब्ध करून देण्यात यश आले. केएफओएन सांगितल्याप्रमाणे १० एमबीपीएस ते १० जीबीपीएस पर्यंतचा इंटरनेट स्पीड या योजनेतून मिळू शकतो. मोबाइल फोन कॉल्सच्या कनेक्टिव्हिटीचा दर्जाही यामुळे सुधारणार आहे. केएफओएन केरळमधील मोबाइल टॉवर्सशी जोडले गेल्यानंतर मोबाइलला ४जी आणि ५जीचा स्पीड मिळू शकतो, असेही सांगण्यात येत आहे.

SL/KA/SL
7 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *