भविषय निर्वाह निधीवरील व्याजदरात होऊ शकते वाढ
नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सातत्याने वाढत असलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर नोकरदारांना दिलासा देण्यासाठी सरकार भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात (Interest Rate On PF) वाढ करू शकते. पुढील महिन्यात गुवाहाटी येथे होणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. सूत्रांचे म्हणणे आहे की बैठकीत 2021-22 साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदरात वाढ केली जाऊ शकते. निवृत्ती वेतनाची किमान रक्कम वाढवण्याबाबतही बैठकीत विचार होऊ शकतो.
त्याआधी बुधवारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या आर्थिक गुंतवणूक आणि लेखापरीक्षण समितीची बैठक होणार आहे. यामध्ये संघटनेच्या आतापर्यंतच्या कमाईवर चर्चा केली जाऊ शकते. त्याआधारे ही समिती भविष्य निर्वाह निधीवरील व्याजदरात (Interest Rate On PF) सुधारणा करण्याची शिफारस करेल. या प्रकरणाशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की मार्चमध्ये होणाऱ्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीच्या एक दिवस आधी किंवा त्याच दिवशी ही शिफारस केली जाऊ शकते. केंद्रीय विश्वस्त मंडळाची शेवटची बैठक मार्चमध्ये श्रीनगरमध्ये झाली होती. यामध्ये 2020-21 साठी भविष्य निर्वाह निधी ठेवींवर 8.5 टक्के वार्षिक व्याज देण्याची शिफारस करण्यात आली होती.
आर्थिक गुंतवणूक आणि लेखापरीक्षण समितीच्या बैठकीत भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) कमाईच्या गुंतवणुकीवरही चर्चा होऊ शकते. सरकारने संघटनेच्या कमाईच्या पाच टक्क्यांपर्यंत पर्यायी गुंतवणूक निधी (एआयएफ) मध्ये गुंतवण्याचा प्रस्ताव दिला होता. समितीच्या एका सदस्याने सांगितले की, मागील बैठकीत आम्ही यासंदर्भात अधिक माहिती मागवली होती. यावेळीही बैठकीत चर्चा होणार आहे. केंद्रीय विश्वस्त मंडळात सरकार, कर्मचारी यांचे प्रतिनिधी असतात. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या निर्णयाचे पालन करणे भविष्य निर्वाह निधी संघटनेला आवश्यक आहे. (Interest Rate On PF)
The government may raise interest rates on provident funds to provide relief to employees against the backdrop of rising inflation. The decision could be taken at a meeting of the Central Board of Trustees (CBT) of the Employees Provident Fund Organization (EPFO) in Guwahati next month.
PL/KA/PL/9 FEB 2022