भारताच्या पहिल्या मतदाराचे निधन

 भारताच्या पहिल्या मतदाराचे निधन

शिमला,दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रित निवडणूकीत देशात सर्वप्रथम मतदान करणारे श्याम शरण नेगी यांचे आज निधन झाले. १०६ वर्षीय नेगी पेशाने शिक्षक होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी पोस्टल  मतदान केले होते. India’s first voter Shyam Saran Negi dies in Himachal

हिमाचल प्रदेशमधील किन्नोरचे रहिवासी श्याम शरण नेगी यांनी १९५१ मध्ये झालेल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिले मतदान केले होते, त्यामुळे ते देशातील सर्वात वयस्कर मतदार मानले जातात. तेव्हापासून आजपर्यंत श्याम शरण नेगी यांनी प्रत्येक निवडणुकीत बूथवर येऊन मतदान केले आहे.

विशेष म्हणजे त्यांनी संपूर्ण आयुष्यात एकूण ३३ वेळा मतदान केलं. त्यांनी बॅलेट पेपरपासून ते ईव्हीएमपर्यंतचा संपूर्ण प्रवास पाहिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. नेगींसारख्या सातत्यपूर्ण मतदान करणाऱ्या व्यक्तींमुळे भारतीय लोकशाहीला बळकटी मिळते. तरुणांनी त्यांचा आदर्श घेतला पाहीजे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

SL/KA/SL

5 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *