फॅशन स्ट्रीटला भीषण आग

 फॅशन स्ट्रीटला भीषण आग

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईतील चर्चगेटमधील फॅशन स्ट्रीटमधील Fashion Street in Churchgate, Mumbai दुकानात भीषण आगीची घटना घडली आहे. या आगीत जवळपास 8 ते 10 दुकानं जळून खाक झाली आहेत. या आगाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत दुकानांच मोठ्याप्रमाणात नुकसान झालं असून लाखो रुपयांचे समान जळून खाक झाले आहे.Fierce fire at Fashion Street

फॅशन स्ट्रीट या ठिकाणी कापडाचे एकाला लागून एक दुकानं आहे.दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास परिसरातील काही कपड्यांच्या दुकानाला आग लागल्याने दुकानांतील कपड्यांनी काही क्षणात पेट घेतला. त्यामुळे आग मोठ्याप्रमाणात पसरली.त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या.अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रम करून दुपारी आगीवर नियंत्रण मिळविले.

स्थानिक प्रशासनाच्या मदतीने हा परिसर तत्काळ निर्मनुष्य करण्यात आला. त्यामुळे आगीत जीवित हानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र कपड्यांच्या दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. जवळपास 8 ते 10 कपड्यांच्या दुकानांतील सगळा माल आगीत जळून खाक झाला आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही.

ML/KA/PGB
5 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *