अखेर शरद पवार राष्ट्रवादी च्या शिबिरात हजर

 अखेर शरद पवार राष्ट्रवादी च्या शिबिरात हजर

अहमदनगर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन दिवसीय “राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा” शिबिरातून झालेल्या चिंतन आणि मंथनातून पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक नवी ऊर्जा मिळणार असून त्याचा उपयोग राष्ट्रवादीच्या मजबुतीसाठी होईल असा विश्वास ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केला.

शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित दोन दिवसीय “राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा” या शिबिराच्या समारोप प्रसंगी उपस्थित पक्ष नेते आणि पदाधिकाऱ्यांना मागदर्शन करताना खा.शरद पवार बोलत होते.

खा. पवार यांनी प्रकृतीच्या कारणास्तव तीन चार मिनिटे भाषण केले. त्यानंतर त्यांच्या वतीने दिलीप वळसे पाटील यांनी भाषण वाचून दाखविले. त्याद्वारे त्यांनी नगर जिल्ह्यातील सहकाराच्या समृद्ध वारशाचे कौतुक केले. संविधानाची शपथ घेऊन सत्तेत आलेले केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार Narendra Modi Government at the Centre प्रत्यक्ष काम करताना मात्र भेदाभेद करुन महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला पळवून नेत आहेत.

राज्यातील सरकार पाडून लोकशाहीला मारक कृती करीत आहेत. अशा गोष्टी घटनात्मक पदावर काम करताना त्यांना शोभत नाहीत असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे आज शरद पवार समारोप करण्यासाठी शिबिराला उपस्थित असताना विरोधी पक्षनेते अजित पवार Leader of Opposition Ajit Pawar मात्र गैरहजर होते. या बाबत दिल्लीच्या शिबिराप्रमाणे पुन्हा त्यांची काही नाराजी आहे की काय? अशी चर्चा रंगली आहे.Finally Sharad Pawar present in NCP camp

काल पासून सुरु झालेल्या या शिबिरात काल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, Leader of Opposition Ajit Pawar विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ , दिलीप वळसे आदी प्रमुख नेत्यानी पक्षाचे नेते व राज्यभरातून शिबिराला उपस्थित दोन हजार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. सर्वांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. राज्यातील घटनाबाह्य पद्घतीने सत्तेवर आलेल्या सरकारला घालवून पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे सूतोवाच सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणातून केले.तसेच पक्षाचा विचार आणि केलेली कामे पदाधिकाऱ्यांनी जनमानसांच्या मनात रुजवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागावे असे आवाहन केले.

ML/KA/PGB
5 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *