भारताच्या आर्थिक प्रगतीला कोरोनाचा धोका

 भारताच्या आर्थिक प्रगतीला कोरोनाचा धोका

नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे (second wave of coronavirus) भारताच्या आर्थिक (Indian economy) प्रगतीचा वेग संकटात सापडला आहे. बँक ऑफ अमेरिका (बोफा) (BOFA) सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की कोरोना साथीमुळे मार्च 2021ला संपलेल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी विकास दराचा (GDP growth Rate) जो अंदाज वर्तवण्यात आला होता तो साध्य करणे कठीण आहे. याआधी मार्च 2021 मध्ये संपलेल्या तिमाहीत भारताचा जीडीपी विकास दर सुमारे 3 टक्क्यांच्या जवळपास असेल असा अंदाज वर्तविला जात होता.

विकास अजूनही कमकुवत आहे
growth is still weak

बोफाच्या मते, देशभरातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे (second wave of coronavirus) जर एका महिन्यापर्यंत टाळेबंदी (Lockdown) सारखी परिस्थिती निर्माण झाली तर यामुळे जीडीपी वाढीच्या दरात (GDP growth Rate) 100-200 बेस पॉइंटची (1-2 टक्के) घट होऊ शकते. बोफाने सांगितले होते की विकास अजूनही कमकुवत आहे आणि महत्त्वाच्या आर्थिक घडामोडी निर्देशकातील घट आणि कर्जाच्या वाढीतील मंदी यामुळे आणखी कमकुवत झाली आहे. त्याशिवाय वाढत्या कोरोना रुग्णांमुळे चिंता वाढली आहे.

डिसेंबर 2020 मध्ये पहिल्यांदाच बोफा इंडिकेटर सकारात्मक
For the first time the bofa indicator wass positive in December 2020

सात घटकांवर आधारित बोफा इंडिया अ‍ॅक्टिव्हिटी इंडिकेटर जानेवारीत 1.3 टक्के होता जो फेब्रुवारीमध्ये कमी होऊन 1 टक्क्यांवर आला. फेब्रुवारीमध्ये या सात पैकी चार घटक जानेवारीच्या तुलनेत मंदावले आहेत, ज्यामुळे निर्देशांकात घट झाली. बोफाच्या अहवालानुसार यामुळे मार्च 2021 च्या तिमाहीत जीडीपीची 3 टक्क्यांची वास्तविक वाढीचा (GDP growth Rate) अंदाज आता संकटात आहे. म्हणजेच इतकी वाढ होणे शक्य नाही. हा निर्देशांक आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये पहिल्यांदा नऊ महिन्यांच्या सलग घसरणीनंतर डिसेंबर 2020 मध्ये सकारात्मक झाला होता.
चालू आर्थिक वर्षात विकासाला आधार देण्यासाठी, चांगली बातमी ही आहे की म्हणजे वास्तविक कर्ज दराचे प्रमाण खूपच कमी होत आहे. बोफाच्या अंदाजानुसार, चालू आर्थिक वर्ष 2021-22 मधील कर्जाची वाढ मागील आर्थिक वर्ष 2021 मधील 5.6 टक्क्यांच्या तुलनेत वाढून 12 टक्क्यांवर जाईल.

भारतात कोरोनाचे विक्रमी नवे रुग्ण आणि मृत्यु
Corona’s record new patients and deaths in India

देशभरात पुन्हा एकदा कोरोना साथीचा (coronavirus) धोका वाढत आहे आणि गेल्या 24 तासांत कोरोनाच्या आजाराचे 2.17 लाख नवे रुग्ण आढळले आहेत आणि कोरोना विषाणूमुळे 1185 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे नवे रुग्ण मिळणे आणि कोरोनामुळे होणारे मृत्यु यात भारत जगातील कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या ब्राझील आणि अमेरिकेच्या आकडेवारीच्या पुढे आहे. अहवालानुसार, राष्ट्रीय टाळेबंदी (Nationide Lockdown) एका महिन्यासाठी जरी लावली तरी जीडीपीमध्ये (GDP growth Rate) 1-2 टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते. देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 16 टक्के आहे आणि या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 30 एप्रिलपर्यंत याठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.
The second wave of coronavirus has put India’s economic growth in jeopardy. Bank of America (BOFA) Securities says the Corona pandemic has made it difficult to achieve India’s projected GDP growth rate for the quarter ended March 2021. Earlier, India’s GDP growth was projected to be around 3 per cent for the quarter ended March 2021.
PL/KA/PL/17 APR 2021

mmc

Related post