#पतमानांकन संस्था फिच ने भारताच्या जीडीपी अंदाजात केली सुधारणा

 #पतमानांकन संस्था फिच ने भारताच्या जीडीपी अंदाजात केली सुधारणा

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था (रेटिंग एजन्सी) फिचने चालू आर्थिक वर्ष 2020-21 साठी भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) अंदाजात सुधारणा केली आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी 9.4 टक्क्यांनी घसरेल असा फिच चा अंदाज आहे. याआधी फिचने भारतीय अर्थव्यवस्थेत 10.5 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तविला होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेत अपेक्षेपेक्षा अधिक चांगली सुधारणा लक्षात घेत पतमानांकन संस्थेने आपल्या अंदाजात सुधारणा केली आहे. मात्र त्याच बरोबर त्यांनी हा सल्लाही दिला आहे की भारताला त्याची खातेपुस्तिका दुरुस्त करावी लागेल.
मंगळवारी जाहीर केलेल्या आपल्या निवेदनात फिच ने सांगितले की कोरोना विषाणू साथीने निर्माण झालेल्या मंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत भारताला आपली ‘खाते पुस्तिका’ दुरुस्त करण्याची आणि दीर्घकालीन योजनेबाबत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. फिच ने सांगितले की, आता आमचा अंदाज आहे की 2020-21 मध्ये भारताच्या जीडीपी मध्ये 9.4 टक्क्यांची घट येईल.
त्याआधी फिच ने भारताच्या अर्थव्यवस्थेत 10.5 टक्के घट होण्याचा अंदाज वर्तविला होता. फिच ने सांगितले की भारतीय अर्थव्यवस्था पुढील काही वर्षांत 11 टक्क्यांहून अधिक (कोणताही बदल नाही) आणि 6.3 टक्के (0.3 टक्के अधिक) दराने वाढेल. पतमानांकन संस्थेने सांगितले की महागाई सध्या उच्च पातळीवर आहे आणि आता त्यात घसरण सुरु व्हायला हवी. यामुळे रिझर्व्ह बॅंकेला 2021 मध्ये व्याज दरात कपात करण्यास मदत होईल असे आमचे मत आहे.
फिच ही तिसरी सुप्रसिद्ध पतमानांकन संस्था आहे, जी स्टँडर्ड अँड पूअर (एस अँड पी) आणि मूडीज चे छोटे रुप आहे. जर एखाद्या कंपनीचे पतमानांकन, संस्थेद्वारे चांगले केले गेले तर त्या कंपनीला बाजारातून पैसे उधार मिळण्यास सुरुवात होते. तसेच, बाजारामध्ये चांगल्या प्रतिमेमुळे, त्याच्या समभागामध्ये तेजी आल्याचे दिसते. म्हणूनच देश, कंपन्या आणि व्यक्ती नेहमी चांगल्या पतमानांकनाच्या शोधात असतात.
Tag-India/GDP/growth/phich
PL/KA/PL/9 DEC 2020

mmc

Related post