#आयसीआयसीआय बँकेने सुरु केले ‘आयमोबाईल पे’ , आता वेगवेगळ्या पेमेंट अॅप्सची आवश्यकता नाही
मुंबई,दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बॅंकेने आज आपले मोबाइल बँकिंग अॅप ‘आयमोबाईल’ ची नवीन आवृत्ती ‘आयमोबाईल पे’ सुरू केली. यासोबतच बँकेचा फिनटेक व्यवसायात प्रवेश झाला. बँकेच्या या नवीन अॅपद्वारे बँकेच्या कोणत्याही ग्राहकाला पेमेंट आणि बँकिंग सारख्या सेवा मिळतील.
हे पेमेंट अॅप ग्राहकांना कोणतेही यूपीआय (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) आयडी किंवा व्यापारी देय देणे, विजेची बिले देणे आणि ऑनलाइन रिचार्ज यासारख्या सुविधा ऑफर करते. अॅप तात्काळ बँकिंग सेवा उदाहरणार्थ बचत खाते, गुंतवणूक, कर्ज, क्रेडिट कार्ड, गिफ्ट कार्ड, ट्रॅव्हल कार्ड आणि इतर अनेक सेवा देईल. ‘आयमोबाइल पे’ चे वापरकर्ते कोणत्याही बँक खात्यात, पेमेंट अॅप्लिकेशन आणि डिजिटल वॉलेट मध्ये पैसे हस्तांतर शकतात. अॅपचे आणखी एक वैशिष्ट्य ‘पे टू कॉन्टॅक्ट’ हे आहे, जे वापरकर्त्यांना आपल्या फोनबुक कॉन्टॅक्टचा यूपीआय आयडी, आयसीआयसीआय बँकेच्या यूपीआय आयडी नेटवर्कवरील नोंदणीकृत आयडी आणि कोणत्याही डिजिटल वॉलेट आणि पेमेंट अॅपवर नोंदणीकृत आयडी पाहण्यास सक्षम करेल. .
वापरकर्त्यांना अॅपद्वारे इंटर-ऑपरेटिबिलिटीची खास सुविधा मिळेल. त्यामुळे यापुढे यूपीआय आयडी लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. तसेच, सर्व पेमेंट ऍप्लिकेशन्स आणि डिजिटल वॉलेटमध्ये पैशांचे व्यवहार करणे सोपे होईल. बँकेने सांगितले की आयमोबाईल पे पेमेंट किंवा बँकिंग सुविधेसाठी वेगवेगळ्या अॅप्सची आवश्यकता देखील भासणार नाही. कारण, हे अॅप ग्राहकांना सर्व आर्थिक व्यवहार करण्यास सक्षम करेल. या प्रक्रियेमध्ये, बँक ग्राहकांना त्यांची वेगवेगळी बँक खाती या अॅपला जोडण्यासाठी आवश्यक कारणही उपलब्ध करेल.
Tag-ICICI/ Bank/ Imobile/ Pay/ App
PL/KA/PL/8 DEC 2020