#द्वेषामुळे 2010 नंतर 2020 पर्यंत अर्थव्यवस्थेची घसरण – जागतिक बँकेच्या माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञाचे मत

 #द्वेषामुळे 2010 नंतर 2020 पर्यंत अर्थव्यवस्थेची घसरण –  जागतिक बँकेच्या माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञाचे मत

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक बँकेचे माजी मुख्य अर्थशास्त्रज्ञ कौशिक बसु यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत सांगितले आहे की 2010 मध्ये जी अर्थव्यवस्था दहा टक्क्यांपर्यंत सकारात्मक होती, ती 2020 पर्यंत दहा टक्के नकारात्मक झाली आहे. त्यांनी म्हटले आहे की ही एक अत्यंत दुर्मिळ परिस्थिती आहे, ज्यामुळे जगभरातील तज्ञ चिंतित आहेत.
त्यांनी सांगितले आहे की कोणत्याही देशाचा विकास केवळ आर्थिक धोरणावरच अवलंबून नसतो, तर त्यात समाजाचा विश्वास देखील महत्वाची भूमिका बजावतो याचे ठोस पुरावे आहेत. लोकांमध्ये फुट पडल्याने आणि वाढत्या द्वेषामुळे लोकांचा विश्वास कमी होत आहे.
कौशिक बसू यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करत थोड्या दिवसांपूर्वीच एक ट्वीट केले होते. कौशिक बसू यांनी आपल्या ट्वीट मध्ये लिहिले होते की देशाच्या हितासाठी आपण या आकडेवारीकडे लक्ष दिले पाहिजे. ही आशियातील विकास आणि कोरोनाची आकडेवारी आहे. ती पाहता भारताची अर्थव्यवस्था कोसळण्याचे कारण कोरोना नियंत्रित करण्यासाठी उचललेली पावले हे आहे असे स्पष्टपणे सांगता येणार नाही. आपण सध्या अशा परिस्थितीत आहोत जी आपण यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. आपल्याला वस्तुस्थितीचा सामना करण्याची गरज आहे आणि त्यानुसार धोरणांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. सध्या गरिबांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.
त्यांनी आशियातील देशांचा विकास आणि कोरोनाच्या प्रकरणांच्या वाढीचे आकडे एकत्रित करुन नोव्हेंबर 2017 पर्यंतच्या आकडेवारीनुसार एक तक्ता सामायिक केला आहे, या तक्त्यानुसार पाहिले तर विकासाच्या बाबतीत बांग्लादेश 3.8 टक्के वाढीसह सर्वात वरच्या स्थानावर आहे, तर भारत 14 देशांच्या यादीत -10.3 टक्के वाढीसह सर्वात खाली आहे. दुसरी आकडेवारी आहे कोरोनाच्या प्रकरणांची ज्यात भूतानमध्ये प्रती 10 लाख लोकांमध्ये कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही, तर भारतात प्रती 10 लाख लोकांमध्ये कोरोनामुळे 95 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Tag-India/ Economy/ World Bank / Kaushik Basu
PL/KA/PL/7 DEC 2020
 

mmc

Related post