#रोजंदारीवरील मजूरांना बनवले संचालक, प्राप्तिकर विभागाने जप्त केला 170 कोटी रुपयांचा काळा पैसा
नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्राप्तिकर विभागाने स्टील उत्पादनांची निर्मिती करणार्या ओडिशा मधील औद्योगिक समुहावर छापेमारी करुन 170 कोटी रुपयांचा काळा पैसा जप्त केला आहे. या व्यतिरिक्त कंपनीमध्ये असे संचालकही पकडले गेले आहेत जे प्रत्यक्षात रोजंदारीवरील कामगार होते. सीबीडीटीने मंगळवारी सांगितले की, समुहाच्या राउरकेला आणि त्याच्या आसपासच्या ठिकाणांवर अधिकार्यांनी 3 डिसेंबरला छापे टाकले होते. कंपनीने 2 आर्थिक वर्षात 17 बोगस कंपन्यांच्या नावे 170 कोटी रुपयांची बोगस खरेदी दाखवली असल्याचे अधिकार्यांना आढळले.
प्राप्तिकर विभागाने या 17 बोगस कंपन्यांची नावे जाहीर केलेली नाहीत पण त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती दिली आहे. औद्योगिक समुहाने या बनावट कंपन्यांच्या नावे बँकेतूनही पैसे उचलले असल्याचे अधिकार्यांना आढळले. रोजंदारीवरील मजुरांना या कंपन्यांचे संचालक बनविण्यात आले होते आणि त्यांच्या नावाने काय काळेधंदे सुरु आहेत याबद्दल या लोकांना कल्पनाही नव्हती.
Tag-Odisha/Income Tax/Black money/Bogus/Company
PL/KA/PL/10 DEC 2020