एप्रिल ते जून या तिमाहीत देशाच्या जीडीपीत 20.1 टक्क्यांची वाढ

 एप्रिल ते जून या तिमाहीत देशाच्या जीडीपीत 20.1 टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एप्रिल ते जून 2021 दरम्यान म्हणजेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी विकास दर (GDP growth rate) 20.1 टक्के राहिला आहे. म्हणजेच, गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत देशाच्या जीडीपीमध्ये 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. परंतु या वाढीचे मुख्य कारण म्हणजे गेल्या वर्षी याच कालावधीत नोंदवली गेलेली प्रचंड घसरण.

जीडीपी विकास दराची सरकारी आकडेवारी जाहीर
Releases government figures of GDP growth rate

एप्रिल ते जून 2021 साठीची ही आकडेवारी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) अंदाजापेक्षाही कमी आहे. रिझर्व्ह बँकेने या कालावधीत जीडीपीमध्ये (GDP) 21.4 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. पहिल्या तिमाहीच्या जीडीपी विकास दराची (GDP growth rate) ताजी सरकारी आकडेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे. एप्रिल ते जून 2020 दरम्यान, देशाच्या जीडीपी मध्ये 24.4 टक्क्यांची मोठी घट झाली होती. त्या तिमाहीच्या तुलनेत 20.1 टक्क्यांची वाढ म्हणजे एप्रिल ते जून 2021 दरम्यान देशाचा जीडीपी एप्रिल ते जून 2019 च्या तुलनेत अजूनही मागेच आहे. जानेवारी ते मार्च 2021 या तिमाहीत देशाचा जीडीपी विकास दर 1.6 टक्के होता.

दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत सुमारे 10 टक्के कमी
about 10 percent lower than two years ago

जीडीपीच्या मूळ आकडेवारीची तुलना केल्यास हे अधिक स्पष्ट होईल. वास्तविक एप्रिल ते जून 2021 दरम्यान देशाचा जीडीपी 32.38 लाख कोटी रुपये होता, जो एप्रिल ते जून 2020 मध्ये 26.95 लाख कोटी रुपयांपेक्षा 20.1 टक्के अधिक आहे. पण दोन वर्षांपूर्वी म्हणजेच एप्रिल ते जून 2019 मध्ये देशाचा जीडीपी 35.66 लाख कोटी रुपये होता. त्याच्या तुलनेत, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा जीडीपी विकास दर (GDP growth rate) अजूनही दोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत सुमारे 10 टक्के कमी आहे. यावरुन कोविडमुळे आलेल्या आर्थिक मंदीमधून बाहेर येण्यास भारताला आणखी वेळ लागणार आहे हे स्पष्ट होते. परंतू अर्थव्यवस्था (Economy) आता सुधारणेच्या मार्गावर आहे ही एक दिलासादायक बाब आहे .

ग्राहक मागणी अजूनही दोन वर्षांपूर्वीच्या पातळीला स्पर्श करु शकलेली नाही
Consumer demand still has not touched the level of two years ago

देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यात सर्वात जास्त योगदान देणारे प्रायव्हेट फायनल कंजप्शन एक्सपेंडिचर (PFCE) म्हणजेच सामान्य लोकांनी वापरावर खर्च केलेली रक्कम एप्रिल-जून 2021 दरम्यान सुमारे 17.84 लाख कोटी रुपये होती, जी मागील वर्षीच्या 14.95 लाख कोटी रुपये पेक्षा जास्त आहे परंतु ही रक्कम दोन वर्षांपूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत अजूनही खूपच कमी आहे. एप्रिल ते जून 2019 दरम्यान, देशात पीएफसीई अंतर्गत सामान्य लोकांनी खर्च केलेली रक्कम 20.24 लाख कोटी रुपये होती. यावरुन देशातील सामान्य ग्राहकांची ग्राहक मागणी (Consumer demand) अजूनही दोन वर्षांपूर्वीच्या पातळीला स्पर्श करु शकलेली नाही.
गेल्या वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात, मोदी सरकारने कोविड -19 (covid-19) साथीमुळे देशव्यापी टाळेबंदी (Lockdown) लागू केली होती. त्यामुळे संपूर्ण देशातील आर्थिक घडामोडी मोठ्या प्रमाणावर ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे अर्थव्यवस्थेत (Economy) ऐतिहासिक घट झाल्याचे दिसले होते. 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या गेल्या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी 7.3 टक्क्यांनी घसरला होता.
Between April and June 2021, the country’s GDP growth rate was 20.1 per cent in the first quarter of the current financial year. That is, the country’s GDP has grown by more than 20 per cent compared to the same quarter last year. But the main reason for this increase is the huge decline recorded in the same period last year.
PL/KA/PL/01 SEPT 2021
 

mmc

Related post