चीनवर मात करून भारत युनोच्या सांख्यिकी आयोगावर
नवी दिल्ली, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या काही वर्षांपासून विविध महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताचे स्थान उंचावताना दिसत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सांख्यिकी आयोगावर भारताची चार वर्षांसाठी निवड झाली आहे. १ जानेवारी २०२४ पासून ही नियुक्ती होणार आहे.परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीटरद्वारे ही माहिती दिली आहे.
या पदासाठी झालेल्या निवडणूकीत चीन, दक्षिण कोरिया आणि युएईवर मात करत भारताने बाजी मारली आहे. सांख्यिकीय प्रणालीची जगातील सर्वोच्च संस्था अशी ओळख असलेल्या संयुक्त राष्ट्र साख्यिकी आयोगाची स्थापना १९४७ मध्ये झाली.
सांख्यिकी आयोग ही आंतरराष्ट्रीय सांख्यिकीय उपक्रमांबाबत सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. सांख्यिकीय मानके निश्चित करणे, संकल्पना आणि पद्धती विकसित करण्यासाठी या जबाबदाऱ्याही ती पार पाडते. ज्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सांख्यिकीय निर्णयांची अंमलबजावणी समाविष्ट आहे.
ML/KA/SL
6 April 2023