आतापर्यंत 2.09 कोटी लोकांना मिळाला 2.04 लाख कोटींचा प्राप्तिकर परतावा

 आतापर्यंत 2.09 कोटी लोकांना मिळाला 2.04 लाख कोटींचा प्राप्तिकर परतावा

नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 2.09 कोटी लोकांना 2.04 लाख कोटींचा कर परतावा (Income tax refund) दिला आहे. बुधवारी विभागाने ही माहिती दिली आहे. विभागाच्या म्हणण्यानुसार यातील 2.06 कोटी प्राप्तिकरदात्यांना 73,607 कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर परतावा देण्यात आला आहे. त्याचबरोबर विभागाने 2.21 लाख प्रकरणांमध्ये 1.31 लाख कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा जारी केला आहे. प्राप्तिकर विभागाने ट्विटरवर म्हटले आहे की, सीबीडीटीने 1 एप्रिल 2020 ते 15 मार्च 2021 पर्यंत 2.09 कोटी करदात्यांना 2,04,805 कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.
प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) वेगाने करदात्यांना कर परतावा देत आहे. असे असूनही, अद्याप अनेक करदाते असे आहेत ज्यांना बराच काळानंतरही आयकर परतावा (Income tax refund) मिळालेला नाही. यामागे बरीच कारणे असू शकतात. प्राप्तिकर विवरणपत्र भरताना आपण परतावा मिळविण्यासाठी जर योग्य बँक तपशील भरला नसेल तर आपल्याला परतावा मिळण्यास विलंब होऊ शकेल. प्राप्तिकर विभागाकडून (Income Tax Department) प्राप्तिकर परतावा थेट करदात्याच्या खात्यात जमा केला जातो, अशावेळी बँक खात्याची चुकीची माहिती भरल्यामुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते. त्याबरोबरच आपण नमूद केलेले बँक खाते पॅन क्रमांकाशी संलग्न केलेले असले पाहिजे.

बँक खाते पूर्व-प्रमाणित नाही
Bank account not Pre validate

वेळेवर प्राप्तिकर परतावा (Income tax refund) न मिळण्याचे एक प्रमुख कारण हे देखील असू शकते की आपण आपले बँक खाते पूर्व प्रमाणित केलेले नसेल. आपण आपले बँक खाते पूर्व प्रमाणित (Pre validate) केले नसल्यास, आपल्या प्रोफाइल सेटिंग्जवर जा आणि त्याठिकाणी बँक खात्याला पूर्व प्रमाणित करण्याचा पर्याय निवडा. याठिकाणी आपण बँक खाते क्रमांक, आयएसएससी कोड, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीची माहिती देऊन आपले बँक खाते पूर्व प्रमाणित करू शकता.

आयटीआर पडताळणी करायला विसरणे
Forget to do ITR verification

अनेक वेळा करदाता प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याशी संबंधित सर्व कामे करतात, परंतु आपली आयटीआर पडताळणी (ITR verification) करायला विसरतात. जोपर्यंत आपण आयटीआरची पडताळणी करत नाही तोपर्यंत आपली प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही हे लक्षात घ्या.
The Income Tax Department has so far given income tax refunds of Rs 2.04 lakh crore to 2.09 crore people so far in the current financial year. This information was given by the department on Wednesday. According to the department, out of this, 2.06 crore income taxpayers have been given personal income tax refunds of Rs 73,607 crore. The department has also issued corporate tax refunds of Rs 1.31 lakh crore in 2.21 lakh cases.
PL/KA/PL/18 MAR 2021
 

mmc

Related post