दादरमध्ये चोरांनी फूटपाथ खोदून केली लाखोंची केबल लंपास
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई परिसरात रस्ते दुरूस्तीची कामे सुरूच असतात. पण चक्क चोरांनी फूटपाथचं काम असल्याचं सांगत तो आणखी खोदला. आणि लाखो रूपयांची केबल लंपास केली. ही तांब्याची केबल एमटीएनलची असून त्यांची किंमत ६ ते ७ लाख रुपये असावी. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पण या घटनेची दादरमध्ये चांगलीच चर्चा झाली आहे. दादरसारख्या भागात अशी घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
TM/ML/SL
11 June 2024