निवासी इमारतीच्या सुरक्षिततेसाठी या गोष्टींची अंमलबजावणी अत्यावश्यक

 निवासी इमारतीच्या सुरक्षिततेसाठी या गोष्टींची अंमलबजावणी अत्यावश्यक

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईसह राज्यातील वेगाने वाढणाऱ्या अन्य महानगरांतील निवासी इमारतींच्या बांधकामविषयक सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. बांधकाम व्यावसायिक आणि वास्तू विशारद यांच्याकडून सुरक्षित बांधकामाबाबत आवश्यक बाबींचे काटेकोर पालन केले जात नसल्याने अनेक अपघातही घडत आहेत. याबाबत प्रख्यात वास्तूविशारद आणि विधान परिषदेचे माजी सदस्य अनंतराव गाडगीळ यांनी सरकारकडे सातत्याने प्रश्न उपस्थित करत, योग्य बांधकाम होण्याबाबत उपाययोजनाही सुचवल्या आहेत. यांची वेळोवेळी दखल घेत सरकारने काही नियमही तयार केले आहेत. मात्र या नियमांच्या काटेकोर अंमलबजावणी बाबत सरकार आणि बांधकाम व्यावसायिक गांभीर्याने दखल घेत नसल्याने गाडगीळ यांनी पुन्हा एकदा एका पत्रकाद्वारे सरकार आणि बांधकाम व्यवसायिकांना आवाहन केले आहे.

अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केलेले बांधकाम सुरक्षा विषयक मुद्दे

१. गाडगीळ यांनी सुचवल्या प्रमाणे सरकारने सर्व डिझायनिंगच्या कामांसाठी वास्तूविशारद प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. मात्र याची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. अगदी अल्प कालावधीचे अभ्यासक्रम शिकलेले आणि फारसा अनुभव नसलेले लोक इमारतींचे इंडरिअर डिझायनींग करतात. परिणामी सुरक्षेची योग्य काळजी घेतली न गेल्याने अनेकदा इमारतींच्या मूळ ढाचाला धक्का बसून इमारती कोसळून अपघात होता.

२. लिफ्टसाठी आता काचेच्या दरवाजांना परवानगी आहे. मात्र तरी देखील फायर प्रुफ मेटलच्या दरवाज्यांच्या वापर केला जातो. आपत्कालिन स्थितीत लिफ्टचा वापर करू नये असा नियम आहे. मात्र आतत्कालिन स्थितीत फायर प्रुफ मेटलचे दरवाजे असलेल्या लिफ्टचा वापर केला गेल्याने लिफ्ट्समध्ये अडकून उपघात होतात. याची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी.

३. मेटलच्या बंद लिफ्ट्समध्ये महिलांशी गैरवर्तन होत असल्याचीही काही प्रकरणे समोर आली आहेत. मॉल्स आणि हॉटेल्समध्ये आता काचेच्या क्युबिकल्स सारख्या लिफ्ट्सचा वापर सर्रास होई लागला आहे. गाडगीळ यांनी सुचवल्यानंतर महाराष्ट्र शासनाने नियम लिफ्ट्स बाबतच्या नियमात बदल करून काचेच्या लिफ्ट्स बसवण्यास परवानगी देण्यासह लिफ्ट्समध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसवणेही बंधनकारक केले आहे,जे रहीवासी इमारतींच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत मात्र दुर्देवाने अजूनही बऱ्याचश्या मोठ्या इमारती आणि हाऊसिंग सोयायटी यांनी काचेच्या दाराच्या लिफ्ट्स बसवलेल्या नाहीत. वास्तुविशारदांनी आता त्यांच्या जास्त उंचीच्या निवासी इमारतीच्या डिझाइनमध्ये काचेच्या दरवाजाच्या लिफ्टचा समावेश करावा, असे आवाहन गाडगीळ यांनी केले आहे.

.नवीन इमारतींभोवतीचा ३०% मातीचा भाग मोकळा ठेवला जाईल,जेणेकरून पावसाचे पाणी झिरपून जाण्यास मदत होईल आणि २६ जुलै सारख्या घटना टाळता येतील. असा नियम पर्यावरण मंत्र्यांनी गाडगीळ यांनी केलेल्या मांडलेल्या सुचनेनुसार केला आहे. परंतु बहुतांश महानगरपालिका क्षेत्रामध्ये याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीत. इमारतींच्या तळमजल्याचे पार्किंगसाठी पूर्णपणे कॉक्रीटीकरण केले जाते परिणामी पावसाळ्यात पूरसदृश्य आपत्कालिन परिस्थिती निर्माण होते.

शहराच्या सुनियोजनासाठी आणि रहिवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी वरील सर्व मुद्दे वास्तू विशारद अनंत गाडगीळ यांनी त्यांच्या विधानपरिषद सदस्यत्त्वाच्या कार्यकाळात वारंवार उपस्थित केले आहेत.मात्र नियम तयार झाले असूनही काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने त्यांनी पुन्हा एकदा सरकार, बांधकाम व्यावसायिक, वास्तू विशारद यांचे लक्ष या प्रश्नांकडे वेधून घेण्यासाठी वरील मुद्दे उपस्थित केले आहेत.

SL/KA/SL

29 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *