राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग अव्वल
पुणे दि २ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेची प्रतीक्षा अखेर संपली आहे. या परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळमार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्य मंडळामार्फत पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. राज्य मंडळ अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत १२ वीचा निकालाबाबत म आज सकाळी 11 वाजता राज्य मंडळाच्या मुख्य कार्यालयात होणाऱ्या पत्रकार परिषदेत सांगितला. राज्यातील नऊ विभागीय मंडळांचा (पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण) एकत्रित निकाल आणि सांख्यिकीय माहिती जाहीर करण्यात आली.
राज्याचा निकाल 89.79 टक्के निकाल लागला आहे, तर कोकण विभाग 94.14 टक्क्यांसह अव्वल आहेत.
निकालाची ठळक वैशिष्टये
१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,४४,७१३ नियमित विद्याध्वाँनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३३,०५८ विश्वार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १२,८६,८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतची टक्केवारी ८९.७९ आहे.
२. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्याथ्यांची एकूण संख्या ३७,५५९ एवढी असून त्यापैकी ३६,९४१ विदयार्थी प्रविष्ट झाले असून २९,६३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.२१ आहे.
३. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ५०,८७६ पुनर्परिक्षार्थी विदयार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५०,३४६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १८,३४९ विदद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३६.४४ आहे.
४. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ८,४४६ दिव्यांग विट्याच्र्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८.३६७ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ७,५७९ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतची टक्केवारी ९०.५८ आहे.
५. इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९४.१४ %) सर्वाधिक असून सर्वांत कमी निकाल लातूर विभागाचा (८४.१४%) आहे.
७. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी १३.१५ असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८६.८०% आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ६.३५% ने जास्त आहे.
८. एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १००
ML/ML/SL