भारतीय सैनिकाच्या हस्ते सावरकर स्मारकात ध्वजारोहण

 भारतीय सैनिकाच्या हस्ते सावरकर स्मारकात ध्वजारोहण

नाशिक, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात भगूरवासी सावरकर बंधूंनी केली याचा आम्हाला अभिमान आहे. सावरकरांमुळे या देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु त्यांना नेहमीच उपेक्षित ठेवले गेले. सावरकर ही केवळ चळवळ नसून हा एक विचार आहे. या विचारांनी प्रेरित होऊन तरुणांनी पुढे काम करावे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक (सावरकर वाडा) भगूर येथे भारतीय सैनिक नायक महेश सोनवणे यांनी ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी शामकांत गोसावी सहआयुक्त नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय विशेष उपस्थिती होती. Hoisting of the flag at the Savarkar memorial by an Indian soldier

कार्यक्रम प्रसंगी सावरकरांच्या मूर्तीस नायक महेश सोनवणे आणि शामकांत गोसावी यांनी पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले.या प्रसंगी वंदे मातरम, भारतमाता की जय, राष्ट्रभक्ती तुझे नाम, सावरकर, सावरकर, देशभक्ती तुझे नाव, सावरकर, सावरकर अशा घोषणांनी सावरकर वाडा दुमदुमून गेला.

भगूरच्या सावरकर वाड्यात स्वातंत्र्य दिन साजरा होणे हा माझ्यासाठी सर्वांत मोठा क्षण आहे. सावरकर स्मारकाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अशा विविध उपक्रमातून युवा पिढीला जोडण्याचा चांगला प्रयत्न आहे. सावरकरांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी मी यापुढेही नक्कीच प्रयत्न करीन, असा विचार सोनवणे यांनी व्यक्त केला.

ML/KA/PGB
15 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *