हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्ये आजपासून नवीन १५ दवाखान्यांची भर

 हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांमध्ये आजपासून नवीन १५ दवाखान्यांची भर

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबईतील नागरिकांना आपल्या घरानजीक आणि मोफत आरोग्य सुविधेचा लाभ देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांच्या संख्येत आज स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर आणखी नवीन १५ दवाखान्यांची भर पडली . यामुळे आपला दवाखान्यांची संख्या आता १८७ झाली आहे. यामध्ये २७ पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर आणि १६० हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना समाविष्ट आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत आपला दवाखान्यांची संख्या २५० पर्यंत नेण्याचे उदिष्ट पालिकेने ठेवले आहे.
पालिकेतर्फे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण अंतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही योजना मुख्यमंत्री श एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आली आहे. मुंबईकर नागरिकांना घरानजीक, अधिकाधिक सुलभरीत्या आणि मोफत उपचार देण्यासाठी या दवाखान्यांच्या माध्यमातून लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

दवाखान्यांची संख्या १७२ होती. ज्यात २५ पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर आणि १४७ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांचा समावेश होता. त्यात आजपासून १५ नवीन दवाखाने आरोग्य सेवेतील रुजू झाल्याने ही संख्या आता १८७ झाली आहे. या दवाखान्यांच्या माध्यमातून आतापर्यंत १५ लाखांहून अधिक नागरिकांनी आरोग्य सुविधेचा लाभ घेतला आहे.
पालिकेने आगामी काळात म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण २५० आपला दवाखाना कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे

ML/KA/PGB
15 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *