सांताक्रूझ येथील आगीत एकाचा मृत्यू , एक जखमी

 सांताक्रूझ येथील आगीत एकाचा मृत्यू , एक जखमी


मुंबई दि.15( एम एमसी न्यूज नेटवर्क): सांताक्रुज येथे निवासी इमारतीला लागलेल्या आगीत एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली उपचार करून तिला घरी सोडण्यात आले .
मिळालेल्या माहितीनुसार सांताक्रुज पश्चिमेकडील टागोर मार्गावर पोद्दार शाळेच्या समोर सहा मजल्याची हरिप्रीत निवासी इमारत आहे .

संध्याकाळी पावणे चारच्या सुमारास त्या इमारतीच्या सहाव्या मजल्याला आग लागली व मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला . अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले . सहाव्या मजल्यावर एक वृद्ध व्यक्ती व एक महिला यांची सुटका करण्यात आली व त्यांना तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आली मात्र पुरुष व्यक्ती नितेश जोशी वय 65 यांना मृत घोषित करण्यात आले तर महिलेला उपचार नंतर घरी सोडण्यात आले , आगीची चौकशी सुरू आहेOne dead, one injured in Santa Cruz fire

ML/KA/PGB
15 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *