येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज

 येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत मान्सून दाखल झाला असून मुंबईकरांना पावसानं चांगलंच झोडपलं आहे. मुंबईसह उपनगर, ठाणे, पालघरमध्ये येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसंच येत्या आठवड्याभरात मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे.हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघरसह विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांत साधारणपणे ढगाळ आकाश आणि शहर आणि उपनगरात गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

ठाणे, रायगड, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून आज 10 जून रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज आणि उद्या कोकणासह दक्षिण आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Heavy rain is expected in the next five days

ML/ML/PGB
11 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *