जोरदार पाऊस, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
छ. संभाजीनगर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात रात्री पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून या जोरदार पावसामुळे उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहीती समोर येत आहे. गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पाऊस नसल्याने जिल्ह्याची वाटचाल दुष्काळा कडे सुरू झाली असताना रात्री सोयगाव तालुक्यात पडलेल्या पावसामुळे शेतातील उभे पिके आडवी झाली असून या नुकसानी मुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.
कपाशी, सोयाबीन, मका आणि इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे तर काही शेतकऱ्याच्या घरांच्या भिंती अती पावसामुळे ढासळल्या आहेत. तर काही भागात पिके वाहून गेले आहे. घोसला, तिडका, बनोटी तसेच इतर काही गावात जोरदार पाऊस पडला आहे.
ML/KA/SL
24 Sept. 2023