भंडारदऱ्याच्या पाण्याने अंब्रेला धबधबा पुन्हा प्रवाहित…

 भंडारदऱ्याच्या पाण्याने अंब्रेला धबधबा पुन्हा प्रवाहित…

अहमदनगर, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यटनस्थळा पैकी प्रसिद्ध असलेल्या अंब्रेला धबधब्यामधून पाणी सोडण्यात आले असून अम्ब्रेला धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या अंब्रेला धबधब्यातून पाणी सोडण्याची मागणी शेंडी येथील नागरीकांसह इतर पर्यटकांनी मागणी केली होती. शनिवारी आणि रविवारी अम्ब्रेला फॉल सोडणार धबधब्याचे दर्शन होणार असून त्यामुळे विकएंडच्या सुट्टीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना अंब्रेलाच्या विहंगम दृश्यांचा नजारा बघावयास मिळणार आहे.

भंडारदरा धरण शाखा अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता भंडारदरा धरणामध्ये होणारी पाण्याची आवक आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार अंब्रेला धबधब्यातून २१८ क्युसेसने विसर्ग सुरु करण्यात आल्याची माहिती उपलब्ध होत आहे. तूर्त जरी भंडारदरा धरणाच्या अंब्रेला धबधब्यातून पाणी सोडण्यात आले असले तरी हा धबधबा प्रत्येक शनिवार आणि रविवार सुरु करण्यात यावा, अशी मागणी पर्यटक तसेच शेंडी गावच्या नागरिकांची आहे.

धरणाच्या पाणलोटामध्ये पावसाचे प्रमाण जरी जेमतेम असले तरी शनिवारी संध्याकाळी मात्र जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. गत २४ तासात भंडारदरा येथे २९ मीमी पावसाची नोंद झाली आहे ११०३९ दलघफु क्षमता असणारे भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून ६०९ आणि वीजनिर्माण केंद्रातून ८२० क्युसेसने पाणी प्रवरा नदीमध्ये सोडण्यात आले आहे.

SL/KA/SL

24 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *