गौरी गणपती विसर्जन थाटात

 गौरी गणपती विसर्जन थाटात

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):संपूर्ण कोकण , मुंबई, सिंधुदुर्ग आणि राज्यभरात आज गौरी गणपतीचे विसर्जन थाटामध्ये सुरू आहे . हे रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे.

या विसर्जनाला सुरुवात सायंकाळी चार वाजल्यानंतर सुरू झाली. गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते तर गौरीचे प्रतीकात्मक स्वरूपात विसर्जन केले जाते . गौरी आवाहनाच्या दिवशी कळशी मधून आणलेल्या तेरडा , तुळस , कुर्डू , हळद , लालमाठ या पाच गौरी स्वरूप वनस्पतींचे विसर्जन जलाशयात केले जाते . अनेक ठिकाणी बहुतेक नद्यांवर विसर्जनासाठी घाट बांधण्यात आलेले आहेत. या घाटावर बाप्पाची आरती करून नंतर नद्यांमध्ये किंवा ओहळात किंवा समुद्रात विसर्जन केले जाते . कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यात गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत असल्यामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे . त्यामुळे प्रशासनाने गणेश विसर्जन करताना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे .

ML/KA/PGB 23 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *