मुंबईत हापूस आंब्याची आवक वाढली
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकणच्या हापूस आंब्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या चार दिवसांपासून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूसची आवक वाढली आहे. दिवसाला साधारण दहा हजारहून अधिक पेट्या बाजारात दाखल होत आहेत. आवक वाढल्याने दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्तया वर्तवण्यात येत आहे.
सध्या हापूस आंबा २ हजार ते ७ हजार रुपये पेटी प्रमाणं विकले जात आहेत. एका पेटीमध्ये ४ ते ८ डझन आंबे असतात. आंब्यांची संख्या दर्जावर अवलंबून असते. उत्तम प्रतीच्या हापूसच्या एका पेटीची किंमत ४ ते १० हजारांपर्यंत देखील जाते.
कोकणातील रत्नागिरी, देवगडमधून सर्वाधिक आंबा नवी मुंबई बाजार समितीत दाखल होत आहे. नवी मुंबई बाजार समितीत ६० टक्के आंब्याची आवक होते. कर्नाटकातून देखील आंबा दाखल होत असून गुजरातमधून गुजरातमधून पुढील महिन्यात आंबा दाखल झाल्यास आंब्याचे दर घसरतील, अशी माहिती एका आंबा व्यापाऱ्याने दिली आहे.
SL/KA/SL
5 March 2023