गुजरात विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

 गुजरात विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर

नवी दिल्ली,दि.३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन  गुजरात विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक  जाहीर केले. Gujarat Election 2022

गुजरातच्या १५व्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहेत. गुजरातमध्ये १८२ जागांवर मतदान होणार असून दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. १ आणि ५ डिसेंबरला गुजरातमध्ये  मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होईल. (Gujarat Election 2022)

गुजरातमध्ये गेल्या २५  वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. यावर्षी  गुजरात निवडणूकांमधील विशेष बाब म्हणजे  अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने  गुजरात विधानसभेसाठी भाजपला थेट आव्हान दिलं आहे. केजरीवाल यांनी मोफत वीज, पाणी आणि शिक्षा सारखी आश्वासने दिली आहेत. त्यामुळं गुजरातमध्ये भाजपसमोरील आव्हान वाढले आहे.

SL/KA/SL
3 Nov.2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *